Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की २४ तासांच्या सुरक्षेत अभिनेत्यावर हल्ला कसा झाला?. सैफ त्याची पत्नी करीना आणि दोन मुले जेह आणि तैमूरबरोबर मुंबईच्या बांद्रा येथे राहतो. त्याच्या घराबाहेर २४ तास रक्षक तयार असतात. सैफच्या अपार्टमेंटमध्ये पॅप्सही प्रवेश करु शकत नाहीत आणि ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.
अभिनेत्याच्या सदनिकेत प्रवेश करण्यासाठी प्रथम परवानगी घेतली जाते आणि परवानगी न मिळाल्यास कोणीही आत जाऊ शकत नाही. एवढे सगळे करुनही सैफ अली खानवर त्याच्याच घरात हल्ला झाला. अशा स्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “एवढी कडक सुरक्षा असतानाही सैफवर हल्ला कसा झाला?”, हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. सैफ अली खान २४ तास सुरक्षेत राहतो, त्यामुळे कोणती चूक झाली की चोर त्याच्या घरात घुसले असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
सैफ अली खानने निवेदनात म्हटले आहे की, तो रात्री घरी असताना अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. करीना कपूर आणि मुले घरात असल्याने ते घाबरले होते. त्या हल्लेखोराने तीन वेळा हल्ला केला. दुखापतीमुळे त्याच्याकडून विजय मिळवता आला नाही. तर इतर नोकर झोपले होते. सर्व लोक आपापल्या घरी होते. नंतर ती व्यक्ती पळून गेली. रात्र झाल्यामुळे त्याला मारेकऱ्यांचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता.
या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर, डाव्या मनगटावर आणि छातीवर जखमा झाल्या आहेत. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्येही चाकूचा एक छोटासा भाग अडकला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने ऑपरेशनची गरज होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी आणि डॉ. उत्तमनी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे.