बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला लग्नाबाबत ‘तो’ प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “लग्न केलं तरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 8, 2023 | 10:22 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta mali happy birthday

प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला लग्नाबाबत ‘तो’ प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “लग्न केलं तरी...”

Happy Birthday Prajakta Mali : मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर ही नाविन्यपूर्ण अभिनेत्री व्यावसायिक क्षेत्रातही उतरली. तिचे पुण्यामध्ये स्वतःचे डान्स क्लासेस आहेत. शिवाय काही महिन्यांपूर्वीच तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. प्राजक्ता इथवरच थांबली नाही. तिने कर्जतमध्ये निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचं आलिशान फार्महाऊस तयार केलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ती या फार्महाऊसवर कुटुंबियांसह धमाल-मस्ती करत आहे. यशाच्या शिखरावर असताना प्राजक्ता लग्न कधी करणार? हा तिच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे.  मध्यंतरी तिचा लग्नाबाबतचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

प्राजक्ता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिला सातत्याने विचारला जातो. काही महिन्यांपूर्वी ती श्री श्री रविशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली होती. यावेळी तिने श्री श्री रविशंकर यांना “लग्न करणं गरजेचं आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी दिलेलं उत्तर आणि प्राजक्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

आणखी वाचा – काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा…; प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? कुटुंबासह केली धमाल-मस्ती

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताच्या या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी म्हटलं होतं की, “हे तू मला विचारत आहे. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची दिसली असती. लग्न करणं काही गरजेचं आहे असं नाही. नेहमीच खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन अथवा एकटं राहून खूश राहा”. श्री श्री रविशंकर बोलत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, याच महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता पण…

पुढे ते म्हणाले, “काही लोक लग्न केलं तरी दुःखीच दिसतात. तसेच एकटं राहिलं तरी दुःखी असतात. तुम्हाला कसं राहायचं आहे हे तुम्ही स्वतः निवडा. नेहमी आनंद राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे”. प्राजक्ताने हा व्हायरल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारेही शेअर केला होता.

Tags: entertainment newsmaharashtrachi hasy jatramarathi actressprajakta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Dharmaveer 2 poster release

"साहेबांच्या हिंदुत्वाची…" धर्मवीर २ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.