कलाकार म्हटलं की त्यांचं फिटनेस हे आलंच. फिट राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ही कलाकार मंडळी योगा, व्यायाम करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ ते नेहमीच चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात. फिटनेसच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे कायमच अधिक लक्ष देते. शिवाय प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते ती तिच्या हटके फोटोशूटमुळे. (Prajakta Mali Fitness Secret)
प्राजक्ताने आजवर मनोरंजन विश्वात स्वमेहनतीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयक्षेत्रात कुणीही वारसा नसताना प्राजक्ताने ही लढाई लढली आहे. कलाकार म्हणून काम करण्याशिवाय एक माणूस म्हणून ही आपण फिट राहणं किती महत्वाचं असतं, याबाबत प्राजक्ता नेहमीच प्रेक्षकांना सांगते असते. फिटनेस रुटींसोबत ती फिटनेसच्या टिप्स ही चात्यांसोबत शेअर करत असते.
पाहा प्राजक्ताच्या फिटनेसचं रहस्य (Prajakta Mali Fitness Secret)
आज प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे, आणि यानिमित्त आज आपण प्राजक्ताच्या फिटनेस, योगा आणि डाएटबद्दल जाणून घेणार आहोत. प्राजक्ताने मालिकाविश्वातून अभिनयाची सुरुवात केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळेच प्राजक्ताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मुख्य नायिकेची भूमिका या मालिकेत प्राजक्ताने साकारली होती. या मालिकेतनंतर प्राजक्ताने स्वतःकडे लक्ष देणं सुरु केलं. फिट राहण्यासाठी तिने धडपड सुरु केली आणि स्वतःच रुटीन ठरवलं. दरम्यान फिट राहण्यासाठी वा योगा शिकण्यासाठी तिने अनेक पुस्तकांचा आधार घेतला. (Happy Birthday Prajakta)
प्राजक्ता आहार आणि योगा या दोन्ही गोष्टींना समान प्राधान्य देते, याबाबत प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितलं, शिवाय तिने अष्टांग योगाचं महत्व ही पटवून दिलं. याबाबत बोलताना ती म्हणाली, “अष्टांग योगा केल्याने चेहर्याची स्किन, शरीर फिट ठेवणे, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणे हे सगळं साध्य केलं जाऊ शकतं. अष्टांग योगा हा शरीरातल्या सगळ्या अवयवांना योग्य वळण देणारा एक चांगला व्यायामप्रकार आहे.”
प्राजक्ताने तिच्या डाएटमध्ये सकस अन्नाचा समावेश केला आहे. “व्यायामाबरोबरच आहार देखील तितकाच महत्वाचा आहे,” असं प्राजक्ताच म्हणणं आहे. प्राजक्ताच्या डाएट रुटीनमध्ये ती, सकाळी उठल्यावर २-३ ग्लास गरम पाणी पिते. त्यानंतर ती एक फळ खाते. आणि त्यानंतर २ तासांनी भरपूर नाश्ता करते. दुपारच्या जेवणाबाबत बोलताना ती म्हणाली की, “दुपारच्या जेवणामध्ये एक ते दीड चपाती, हिरवी पालेभाजी, वरण किंवा कडधान्ये यांचा समावेश असतो. असा सकस आहार असलेले जेवण मला खूप आवडतं.”
हे देखील वाचा – Man Dhaga Dhaga New Episode: सार्थकला होणार आनंदीवरच्या प्रेमाची जाणीव ?
प्राजक्ता चहाप्रेमी आहे, चहामध्ये प्राजक्ता साखरेऐवजी गूळ घालते आणि रोज संध्याकाळी चहा पिते.