कलाकार हे सोशल मीडियावर नेहमी त्यांच्या हटके फोटोशूटने चाहत्यांना भुरळ घालतात. अश्यातच एक मराठमोळी अभिनेत्री ती नेहमी तिच्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय .ती अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर, सई ही तिच्या अभिनयासोबतचं ती तिच्या हटके लुकणे चाहत्यांना भुरळ घालते.सई अनेक चित्रपट,मालिका आणि सध्या ओटीटी माध्यमांकडे वळल्याचं पाहायला मिळतंय.तर अनेक वेबसिरिजमधून भेटीस येते. सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिच्या जबरदस्त फोटोशूटने घायाळ करते. तर तिने नुकतेच काही फोटो शेअर केले. पण हे फोटो पाहून चाहहते घायाळ झालेत.(Sai Tamhankar)

सई ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक आहे.तर आता देखील तिने असेच काही फोटो शेअर करत चाहत्यांचे मन जिंकली.खरंतर सई सध्या तिच्या हटके ड्रेसिंग आणि हटके लूकमुळे चर्चेत असते.तर अश्यातच तिने सध्या पैठणी साडीतील फोटो शेअर केलेत.सईचा हा पारंपरिक साजशृंगार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. यात तिने पैठणी साडी,पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याचा गजरा, हातात हिरव्या बांगड्या आणि नथ असा साज केलेली सई खूपच सुंदर दिसते. यासोबत सईने सालस असा कॅप्शन देखील या फोटोला दिलं. तर तिचं हे सौंदर्य चाहत्यांना आवडलं असून चाहत्यांनी नाजूक साजूक, सालस सोजवळ,अप्रतिम सौंदर्य, चंद्र, निःशब्द अश्या अनेक कमेंट वर्षाव केला आहे.(Sai Tamhankar)
हे देखील वाचा: अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा

सई ही बोल्ड आणि बिदस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.सोशल मीडियासोबतच सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षक म्हणून पाहायला मिळते. सईने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. इंडियन लॉकडाऊन,मिमी अश्या काही हिंदी चित्रपटात आणि वेबसिरीजमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर आता सई कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
