छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका सहकुटुंब सहपरिवार सध्या प्रेक्षकांना नात्यांचं महत्त्व पटवून देतेय. चार भावांच्या कुटुंबाची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळतो. या मालिकेतील कथानक आणि पात्र हे नेहमी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात.मालिकेतील सर्वच पात्र हे अल्पावधीतच चाहत्यांची लोकप्रिय झाली असून या मालिकेतील अंजी आणि पश्या याची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ही जोडी खरतर त्यांच्या खट्याळ स्वभावामुळे नेहमी चर्चेत असते.तर आता या मालिकेतील पश्या म्हणजे आकाश नलावडे यांची लगीनघाई सध्या सुरु आहे. आणि अश्यातच या मालिकेतील कलाकारांनी आकाशच केळवण केल्याचं पाहायला मिळतंय. काही महिन्यांपूर्वी आकाशने आपला साखरपुडा उरकला होता. तर आता त्याच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.(Akash Nalawade)

पश्या म्हणजे आकाश नलावडे सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असतो.मालिकेतील सर्वच कलाकरांसोबत तो धम्माल मस्तीचे रिल्स,तसेच मालिकेचे काही bts व्हिडिओ शेअर करत असतो. त्याला यामध्ये अंजी देखील साथ देत असते.आता अभिनेत्याला खऱ्या आयुष्यातील अंजी मिळाली आहे.तीच नाव रुचिका धुरी आहे. नुकतंच आकाश नलावडेनेचे केळवणाचे फोटो समोर आले आहेत,पण हे केळवण मोरे कुटुंबाने केलं आहे.
====
हे देखील वाचा – ‘मौसम आशिकाना..’ म्हणणारी प्राजक्ता पडलीय का प्रेमात?
====
या मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकर हिने केळवणाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून आमच्या पश्याचं केळवण, #missionimpossible झालं पॉसीबल असं कॅप्शन त्यांनी दिलन आहे. तर या फोटोमध्ये सहकुटुंब सहपरिवार यांची संपूर्ण टीम दिसत असून त्यांनी थाटामाटात आकाशाचं केळवण केलं. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. नंदिताने शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या आकाशवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.(Akash Nalawade)
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सर्वच कलाकारांमध्ये ऑन स्क्रीनप्रमाणे ऑफ स्किन बॉंडदेखील पाहायला मिळतोय.हे सर्वच कलाकार नेहमी एकमेकांसाठी स्पेशल पोस्ट करत नेहमी एकमेकांचं कौतुक करत असतात, यासोबत हे कलाकार सेटवर देखील धम्माल मस्ती करत असतात. आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.