छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी गेल्या महिन्यातच पहिल्यांदा आई झाली. १८ डिसेंबरला तिने मुलाला जन्म दिला. देवोलीनाला आई होऊन आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नाव उघड केले आहे. तिने ख्रिसमसच्या वेळी चेहरा लपवून मुलाची पहिली झलक दाखवली आणि आता प्रजासत्ताक दिनानंतर त्याचे नाव जाहिर केले होते. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर बाळाचे नाव शेअर केले आहे. (devoleena bhattacharjee baby boy name)
“जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याचे स्वागत करतो, तेव्हा आमचे हृदय फुलते. भेटा ‘आनंद’, आमच्या आनंदाचे भांडार” असं हटके कॅप्शन देत देवोलीनाने तिच्या मुलाबरोबर चे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्याबरोबर तिचा पतीही दिसत आहे. या पोस्टमध्ये देवोलिना लाल रंगाचा फुलांचा प्रिंटेड सूट आणि चांदीचे कानातले घातलेली दिसत आहे. या दरम्यान तिच्या कपाळावर चंदन लावलेले दिसत आहे आणि तिने आपला मुलगा जॉयला आपल्या मांडीवर घेतले आहे. तर पती शाहनवाजही तिच्याबरोबर पोज देत आहे.
आणखी वाचा – 28 January Horoscope : मंगळवारचा दिवस असेल स्वप्नपुर्तीचा, ठरवलेली सर्व कामे होतील पूर्ण, जाणून घ्या…
अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नाव जॉय ठेवले आहे. या नावाचा अर्थ आनंद आहे. अलिकडच्या एका व्हिडिओमध्ये, दोघांनी नवीन पालक होण्याच्या आव्हानांबद्दल उघडपणे भावाना व्यक्त केल्या होत्या. शाहनवाजने सांगितले की त्यांच्या मुलाला फक्त देवोलीनाच्या कुशीत झोपायला आवडते, त्यामुळे दोन्ही पालकांना रात्रीची झोप येत नाही. या आव्हानांना न जुमानता, दोघेही आपल्या नवजात बाळाबरोबर वेळ घालवत असतात.
दरम्यान, देवोलीना आणि शाहनवाज डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले. हे जोडपे सध्या त्यांच्या नवजात बाळाचे संगोपन करण्याच्या आनंदाचा आणि आव्हानांचा अनुभव घेत आहे. देवोलीनाने ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस’, ‘दिल दिया गल्लान’ यांसारख्या मालिका आणि शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.