सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२१ वर्षांनंतर जिनीलीया देशमुखचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, राजामौलींकडून कौतुक, म्हणाले, “मी तुझी वाट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 18, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh comeback

२१ वर्षांनंतर जिनीलीया देशमुखचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, राजामौलींकडून कौतुक, म्हणाले, "मी तुझी वाट…"

Genelia Deshmukh comeback : ‘सितारे जमीन पर’च्या यशानंतर, जिनीलीया डिसोझाने तिच्या आगामी ‘ज्युनियर’ या चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज होत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या प्री-रिलीझ इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेतली, जिथे दोघांनीही भावुक असा क्षण शेअर केला. तब्बल २१ वर्षांनंतर, पुन्हा री-युनियनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांना त्यांच्या २००४ च्या ‘सई’ या चित्रपटाची आठवण आली. अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तेव्हा एस.एस. राजामौली यांनी तिचे भरभरुन कौतुक केलेले पाहायला मिळाले.

ज्युनिअर’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमाला दिग्दर्शक, निर्मात राजामौलींनीही हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी जिनीलीयाच्या तेलुगू इंडस्ट्रीतील पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘पिंकव्हिला साऊथ’च्या वृत्तानुसार, राजामौली जिनिलीयाला म्हणाले, “किती वर्षे झाले पण तू अजूनही तशीच दिसत आहेस. मी सिनेमॅटोग्राफर सेंथिलला विचारलं होतं की, आपल्याला नवीन जिनिलिया दिसेल का तर तोसुद्धा म्हणाला हो नक्कीच. त्यामुळे मी आतुरतेने तुझी वाट बघत आहे”.

आणखी वाचा – ‘पंचायत’च्या जावयाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, हार्ट अटॅक आलाच नव्हता; स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Rajesh Manne Official (@rajeshmanne1)

जिनिलीया यावर म्हणाली, “तुम्ही खूप चांगले आहात सर माझ्यासाठी तुमचे हे शब्द फार महत्त्वाचे आहेत”. जिनिलीया शेवटचं ‘ना इश्तम’ या तेलुगू चित्रपटातून झळकली होती. त्यानंतर आता ती ‘ज्युनिअर’ चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. जिनिलीयाने आजवर ‘बॉईज’, ‘सचिन’, ‘हॅपी’, ‘बोम्मारिल्लू’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘उरुमी’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केलं आहे.

आणखी वाचा – ५०शी ओलांडलेल्या मलायका अरोराने वयाच्या मर्यादा ओलांडल्या, लेकाबरोबरच्या ट्रिपदरम्यानचा बोल्डनेस प्रेक्षकांना खटकला, म्हणाले…

जिनीलीया आणि एस.एस. राजामौली यांनी ‘सई’ या चित्रपटात एकत्र काम केले. हा चित्रपट दोघांच्याही कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मैलाचा दगड ठरला. ‘ज्युनियर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. राधाकृष्ण रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात किरीटी रेड्डी, श्रीलीला आणि व्ही. रविचंद्रन यांच्यासह जिनीलीयाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटासह जिनीलीया तेलगू सिनेमात पुनरागमन करीत आहे.

Tags: genelia deshmukhsouth industrysouth movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Paaru Serial Update

Paaru Serial : अहिल्याने पारुला सून म्हणून स्वीकारलं?, मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश, म्हणाले, "हे फक्त स्वप्न नको"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.