मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, दोघांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो केले शेअर, म्हणाली, “जोश्यांची सून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 4, 2026 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Apurva Gore wedding

'आई कुठे…' फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, दोघांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो केले शेअर, म्हणाली, "जोश्यांची सून…"

Apurva Gore wedding : मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अपूर्वा गोरे सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ईशा या भूमिकेमुळे अपूर्वाला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र, आता अपूर्वा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ‘ठरलं’ असं म्हणत अपूर्वानं सोशल मीडियावर लग्नाची गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून अपूर्वा चर्चेत आहे. तिचा होणार होणारा जोडीदार कोण आहे हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवलं होतं. आता मात्र अपूर्वाने तिच्या होणाऱ्या जोडीदाराबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘शाळा’ या मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेता अंशुमन जोशीसह अपूर्वा लग्नबंधनात अडकणार आहे.

अपूर्वाने सोशल मीडियावर अंशुमन आणि दोघांच्या कुटुंबाबरोबरचे काही खास फोटो शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आनंदघन येई घरा. Introducing you all गोरेंचा जावई- अंशुमन आणि जोश्यांची सून अपूर्वा. आम्हाला एकत्र ठेवणारी आणि निःस्वार्थ प्रेम करणारी कुटुंबे मिळाल्याबद्दल आम्ही धन्य आहोत. आम्ही तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो”.

आणखी वाचा – अपूर्वाच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ समोर, अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री, बालकलाकार म्हणून भूमिका गाजलीय

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

आता अपूर्वा आणि अंशुमन केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अपूर्वाच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आई-वडील आणि सासू-सासरे अशी संपूर्ण फॅमिली पाहायला मिळत आहे. याशिवाय इतरही जवळचे कुटुंबीय त्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – रुचिता-राकेशमुळे कॅप्टन्सी टास्क रद्द?, पूर्ण घराला शिक्षा; राकेश स्पष्टच म्हणाला, “घरात मी राहणार नाही…”

अंशुमनने ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आणि त्याची या चित्रपटातील भूमिकाही गाजली होती. ‘फास्टर फेणे’, ‘फुंतरू’, ‘म्हैस’ आणि ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार, रसिक…. आणि बरंच काही…असं त्यानं त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लिहिलं आहे.

Tags: apurva goreApurva Gore weddingmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Famous Marathi Actress Accident Story

"१८ वर्षीय मुलाने कार चालवत धडक दिली", मराठी अभिनेत्रीचा अपघात; 'तो' प्रसंग सांगत म्हणाली, "शुद्ध आली तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.