सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Malaika Arora father death : मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण समोर, पोस्टमॉर्टम रिपोर्टद्वारे खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2024 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
malaika arora father postmortem report

मलायका आरोराच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण आले समोर

सध्या मलायका अरोरा वडिलांच्या निधनामुळे खूप दु:खी आहे. बुधवारी तिचे वडील अनिल मेहता यांनी राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या केली. निधनाची बातमी समजताच पुण्यामध्ये असलेली मलायका त्वरित दाखल झाली. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिची अवस्थादेखील खूप वाईट झाली असल्याचेही दिसून आले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याचवेळी तिची बहीण अमृता आरोरादेखील दिसून आली होती. अनेक बॉलिवूड कलाकार मलायकाला धीर देण्यासाठी उपस्थित राहिले होते. (malaika arora father postmortem report)

मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचा मृतदेह भाभा रुग्णालयात हलवण्यात आला होता. तिथे त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. आता याचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या निधनाचे कारण समोर आले आहे. ‘न्यूज १८’च्या अहवालानुसार बुधवारी रात्री ८ वाजता त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. आता कारण समोर आले असून या रिपोर्टमध्ये शरीरात व शरीरावर खूप जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. त्यामुळे आता यामध्ये अजून कोणते खुलासे होणार? यावर आता सगळ्यांचे लक्ष आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्कीला काय प्रॉब्लेम आहे?”, अरबाजची कानउघडणी करत जान्हवीचा थेट सवाल, धमकीही दिली, म्हणाली, “तुमच्या विरुद्धच…”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

‘आयएएनएस’च्या रिपोर्टनुसार, आत्महत्येच्या काही तासांपूर्वी त्यांनी मलायका व अमृता यांना फोन करुन, “मी खूप थकलो आहे” असं सांगितलं होतं. दरम्यान मलायकानेदेखील वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”.

आणखी वाचा – ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूरने मलायकाची सोडली नाही साथ, वडिलांच्या मृत्यूनंतर धीर देताना दिसला अभिनेता, व्हिडीओ समोर

मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”. मात्र अजून त्यांच्या रिपोर्टमध्ये काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: deathmalaika arorapostmortem report
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Next Post
Malaika Arora Father Death

"मी आजारी आहे आणि…", मृत्यूपूर्वी मलायकाच्या वडिलांनी लेकींना सांगितली होती 'ही' गोष्ट, सूत्रांचा दावा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.