गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबीना दिलैक आई होणार, बेबी बंप दाखवत फोटो केला शेअर, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 16, 2023 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rubina Dilaik Pregnancy

लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबीना दिलैक आई होणार, बेबी बंप दाखवत फोटो केला शेअर, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

हिंदी मालिकांमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक. रुबीनाने छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. ‘बिग बॉस’ हिंदीमध्येही ती पतीसह सहभागी झाली होती. मात्र काही महिने ते कलाविश्वापासून दूर आहे. आता यामागचं कारण समोर आलं आहे. रुबीनाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने गरोदर असल्याचं सांगत खास फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेरीस या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

रुबीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं बेबी बंप दिसत आहे. रुबीना गरोदर असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा होत्या. तिचे विमानामधील काही फोटोही व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये रुबीनाचं बेबी बंप दिसत होतं. मात्र गरोदरपणाच्या चर्चांवर तिने मौन कायम राखलं होतं. आता अखेरीस पती अभिनवरबरोबर फोटो शेअर करत तिने गुडन्यूज दिली.

आणखी वाचा – Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”

गेले काही दिवस रुबीना व अभिनव परदेशात व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसले. आताही तिने शेअर केलेले फोटो हे अमेरिकेमधील असल्याचं बोललं जात आहे. एका जहाजावर पोझ देताना दोघंही या फोटोमध्ये दिसत आहेत. तसेच रुबीनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. रुबीनाने फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

आणखी वाचा – “सोनी मराठीवाले मला उभं करणार की नाही याबाबत…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत विचारताच असं का म्हणाली विशाखा सुभेदार?

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

अनेक कलाकार मंडळींनी रुबीना व अभिनवचं अभिनंदन केलं. लग्नाच्या पाच वर्षांनंतर रुबीनाने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०१८मध्ये रुबीना व अभिनवचं थाटामाटात लग्न पार पडलं. लग्नानंतर रुबीना व अभिनवमध्ये बरेच वादही झाले. मात्र ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये रुबीना व अभिनव यांच्यामधील नात्याला नवं वळण मिळालं.

Tags: bollywodd actressentertainment newsTelevision
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Nikhil Ratnaparkhi got cheated in Online Shopping

"अ‍ॅमेझॉनवाले चोर आणि…", ऑनलाईन खरेदी करताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची फसवणूक, संताप व्यक्त करत म्हणाला, "निव्वळ फालतुपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.