Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ सिझन ६ च्या घरात पुन्हा एकदा वादळ उठल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असणारी राखी सावंत आणि रोशन भजनकर यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या या प्रोमोमध्ये या दोघांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो. प्रोमोमध्ये राखी रोशनला “नल्ला” म्हणताना दिसते. तिच्या या वक्तव्यामुळे रोशन संतापतो आणि तिला स्पष्ट शब्दांत सांगतो, “मला नल्ला बोलू नको.” मात्र राखी तिथेच थांबत नाही. ती पुढे म्हणते, “नल्ला म्हणजे जो काहीच काम करत नाही, कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही आणि तो तू आहेस.” (Bigg Boss Marathi 6)
राखीच्या या टोमण्यामुळे रोशनचा पारा आणखी चढतो. रोशन स्वतःची बाजू मांडत म्हणतो, “मी इथे काम करतो, असाच बसून नसतो.” त्यावर राखी पुन्हा त्याला भडवत विचारते, “बिग बॉसच्या घरात पिकनिकसाठी आला आहेस का?” या प्रश्नामुळे वातावरण अधिकच तापतं. दोघांमधील वाद इतका वाढतो की रोशन संतापून म्हणतो, “तुझ्या जागी मुलगा असता तर आतापर्यंत फुटला असता.” राखीही मागे हटत नाही. ती रोशनला आणखी चेतावणी देत म्हणते, “तुझ्यात दम आहे का?” या संवादानंतर घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाल्याचं दिसत आहे. (Bigg Boss Marathi 6)
‘बिग बॉस’च्या घरात लहानसहान कारणांवरून वाद निर्माण होणं नवीन नाही. मात्र राखी आणि रोशनमधील हा वाद पुढे किती वाढणार? आणि त्याचा घरातील इतर सदस्यांवर व त्यांच्या खेळाच्या समीकरणांवर काय परिणाम होणार?, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. घरात राखी आल्यापासून घरात पुढे कोणता राडा होणार?, घरात कोणत नवीन वादळ येणार?, याकडे साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. (Bigg Boss Marathi 6)
आणखी वाचा – “कट रचून गर्भाशय काढलं अन्…” बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप




