रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कमळी’ मालिकेत रोमँटिक TWIST; ऋषीच्या नजरेत कमळीसाठी प्रेम, तर राजनसमोर येणार कामिनीचं सत्य?

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 29, 2025 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kamali Serial New Twist

'कमळी’ मालिकेत रोमँटिक TWIST

Kamali Serial New Twist : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कमळी’ या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. मालिकेतील कमळी आणि ऋषीच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता निखिल दामले आणि अभिनेत्री विजया बाबर यांच्या जोडीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळताना दिसत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण आल्यामुळे पुढे नेमकं काय घडणार? यावर सर्व प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

सध्या मालिकेत राजन महाजन जे प्रत्यक्षात कमळीचे वडील आहेत. यांनी कमळीचा जीव वाचवल्यामुळे कमळी आता पूर्णपणे बरी झाली असून तिने पुन्हा कॉलेजला जाण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वाहिनीने मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामधून मालिकेत एक रोमँटिक आणि रंजक वळण येणार असल्याचं दिसत आहे. तर मालिकेच्या या प्रोमोमध्ये कमळी बरी झाल्याचं पाहून ऋषी तिच्याकडे आनंदाने आणि एकटक नजरेने पाहताना दिसतो. हे दृश्य पाहून निंगी आणि कमळीच्या काही मैत्रिणी ऋषीला विचारतात, “काय झालं ऋषी सर? तुम्ही एकटक नजरे पाहून मनातल्या मनात का हसताय?”

आणखी वाचा – “कधीच सूनेसारखं वागवलं नाही…”, सासूच्या निधनानंतर अमृता देशमुख भावुक; म्हणाली, “प्रसाद आणि पप्पा…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यावर कमळीची एक मैत्रीण म्हणते, “असं एकटक पाहणं आणि मनातल्या मनात हसणं असं माणूस कधी करतो, माहिती आहे का?” यावर कमळी आणि निंगी विचारतात, “कधी?” तेव्हा ती मैत्रीण उत्तर देते, “जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा!” हे ऐकून कमळी मात्र चकित होते. दुसरीकडे, राजन महाजनला त्यांच्या मोठ्या मुलीच्या चेहऱ्याचं स्केच तयार झाल्याची बातमी कळते. त्यामुळे ते आपल्या मोठ्या मुलीला पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक झालेले दिसतात. हीच घटना मालिकेत पुढे मोठा ट्विस्ट घेऊन येणार असल्याचं संकेत देते. आता मालिकेत ऋषी खरंच कमळीच्या प्रेमात पडला आहे का? आणि राजनला कमळी ही त्यांचीच मुलगी आहे, हे सत्य कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहेत.

आणखी वाचा – चार लग्न, १७ अफेअर्स आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा 91 व्या वर्षी घरातच आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू अन्…

Tags: Kamali Serial New Twistmarathi entertainment newsmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Rupali Bhosle Birthday Gift

रूपाली भोसलेला वाढदिवसानिमित्त मिळाली 'ही' खास भेटवस्तू; 'तो' व्हिडीओ व्हायरल अन् म्हणाली, "१७ वर्षांच्या सोबतीची साथ आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.