Rupali Bhosle Birthday Gift: कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतात. मालिका असो किंवा चित्रपट, कलाकार नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मालिकेतील सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका असो प्रेक्षक कलाकारांशी त्यांच्या अभिनयामुळे जोडले जातात. त्यामुळेच कलाकार हळूहळू प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनतात. दरम्यान, ‘लपंडाव’ या लोकप्रिय मालिकेत सरकारची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिचा आज वाढदिवस आहे. या खास दिवशी रुपालीला एका अत्यंत खास व्यक्तीकडून खास भेटवस्तू मिळाली आहे.
रूपाली भोसले ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावरून तिच्या खासगी आयुष्याबाबत अपडेट्स देताना दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. वाढदिवसानिमित्त रूपालीने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुपालीला वाढदिवसानिमित्त अनेक भेटवस्तू मिळताना दिसतात. मात्र, तिच्या राजू नावाच्या मदतनीसने दिलेली भेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या खास भेटवस्तूचा क्षण रूपालीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. (Rupali Bhosle Birthday Gift)
आणखी वाचा – ‘कमळी’ मालिकेत रोमँटिक TWIST; ऋषीच्या नजरेत कमळीसाठी प्रेम, तर राजनसमोर येणार कामिनीचं सत्य?
व्हिडीओ शेअर करताना रूपालीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “हा आहे राजू… जो गेली १७ वर्षे माझ्यासोबत आहे. या सगळ्या वर्षांत आम्ही एकत्र खूप काम केलं, खूप मजा केली आणि कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरलो. राजू कधी कुटुंबाचा भाग झाला, हे कळलंच नाही. आज अशी परिस्थिती आहे की, माझे आई-वडीलसुद्धा मला नाही, तर आधी राजूलाच फोन करतात. शूटचा कॉल टाइम असो किंवा काहीही… आधी राजूलाच फोन जातो. ‘राजू दादा, आपण आहात ना?’ आणि तो म्हणतो, ‘हो, मी आहे… कॉल टाइम देतो.’ असा आहे राजू…” रूपालीच्या या पोस्टमुळे कलाकार आणि त्यांच्या टीममधील नातं किती आपुलकीचं असतं, याचं सुंदर उदाहरण पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडूनही रूपाली आणि राजूच्या या नात्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Rupali Bhosle Birthday Gift)




