दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ सिनेमागृहात रिलीज होऊन अवघे तीनच आठवडे झालेत, पण ह्या सिनेमाची क्रेझ कायम राहण्याबरोबरच ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांचा सुंदर अभिनय, सिनेमाचं उत्तम दिग्दर्शन व एकूणच स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा महिला प्रेक्षकांसह पुरुष प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलाय. राज्यासह देश-विदेशातील सिनेमेचे शोज जवळपास हाऊसफुल्ल होत असून सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्सही तोडलेत. (baipan bhari deva box office)
हे देखील वाचा : बाईपणच घवघवीत यश तरी केदार शिंदेनी केली खंत व्यक्त
सिनेमाने आतापर्यंत ३० हुन अधिक कोटींची कमाई केली असून ॲडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे, बाईपण भारी देवाने एका दिवसात ६.१० कोटींची कमाई करत रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला होता. वेडने एका दिवसात ५.७० कोटींची कमाई केली होती. आपल्या सिनेमाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडल्याबद्दल अभिनेता व ‘वेड’चा दिग्दर्शक रितेश देशमुखने ट्विटरवर बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदे व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याने प्रेक्षकांचे आभार मानत सिनेमाने कमाईचे आणखी रेकॉर्ड मोडण्याची इच्छा व्यक्त केली. (riteish deshmukh tweet on baipan bhari deva)
काय म्हटला रितेश आपल्या ट्विटमध्ये (riteish deshmukh tweet)
रितेश आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “मी अत्यंत अभिमानाने हे लिहितो, की वेडने रचलेला एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बाईपण भारी देवा या सिनेमाने मोडला आहे. मराठी चित्रपट सशक्त केल्याबद्दल मला आमच्या प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे, जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडे, निखिल साने आणि बाईपण भारी देवा या चित्रपटातील सहा महिला प्रमुख कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. सिनेमाचं असाच गौरवशाली ब्लॉकबस्टर रन चालू राहू दे, आणखी रेकॉर्ड मोडू दे.”
I write this with immense pride that the Highest Single Day Box Office collection record set by VED has been broken by #BaipanBhariDeva. I want to thank our audience for empowering Marathi Cinema. Many congratulations to Director @mekedarshinde, @jiostudios #JyotiDeshpande… pic.twitter.com/pFjaesElfD
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 10, 2023
रितेशचं हे ट्विट केदार शिंदे यांनी रिट्विट करत त्याचे आभार मानताना म्हणाले, “मनापासून धन्यवाद.. लवकरच हा रॅकोर्ड आपल्या वेगळा मराठी सिनेमाने मोडावा हीच इच्छा.. कारण त्यानेच मराठी सिनेमा झंझावात निर्माण करेल. श्री स्वामी समर्थ”. ‘बाईपण भारी देवा’ची निर्मिती जिओ सिनेमाज व माधुरी भोसले यांनी केली असून लेखन वैशाली नाईक व संगीत सई पियुषी यांनी केलंय. (baipan bhari deva movie)