शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी ६’मधून राकेश बापट घराबाहेर, अनुश्रीचे शब्द खटकले, तोडफोड केली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 19, 2026 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi 6

'बिग बॉस मराठी ६'मधून राकेश बापट घराबाहेर, अनुश्रीचे शब्द खटकले, तोडफोड केली आणि…

bigg boss marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ च्या घरात तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये काल शनिवारी पहिला भाऊचा धक्का पार पडला. या धक्क्यावर रितेश देशमुखनं सर्व सदस्यांना चांगलंच सुनावलं. सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली. असं असलं तरी आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात कशावरुन तरी भांडण झाल्याचं समोर आलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हा वाद एक सदस्य घराबाहेर पाडण्यापर्यंत टोकाला गेला असल्याचं समोर आलं.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनुश्री आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. हा वाद नेमका का झाला आहे हे समोर आलं नसलं तरी अनुश्रीने बोललेलं राकेशला पटलेलं दिसत नाही. इतकंच नाहीतर राकेश ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड करत घराबाहेरही जायला निघतो. वादादरम्यान अनुश्री म्हणते, “जिथे तू हात धरुन मला उठवलंस ना, तिथे तू माझ्या डोक्यात गेलास. यावर राकेश म्हणतो, “डू नॉट ब्लडी से दॅट अगेन. २५ वर्ष मी एवढं काम केलंय पण कोणाची हिंमत नाही झाली मला कोणी असं बोलेल. मला नाही राहायचं या घरात”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठी 6 मध्ये रितेश देशमुखने केलं प्रभू शेळकेचं भरभरून कौतुक; म्हणाला, “Entertainment चा Don…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राकेशला आता ‘बिग बॉस’च्या घरात थांबायचं नाही आहे त्यामुळे तो ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड करत घराबाहेर जायचं असं म्हणतो. यावर ‘बिग बॉस’ही घराचं दार उघडतात. हे पाहून सगळेच चक्रवतात. आता राकेश खरंच ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडणार का?, अनुश्री आणि राकेशमधील वाद नेमकं काय वळण घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: bigg bossBigg Boss Marathi 6raqesh bapat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Govinda On Extra Marital Affair

"माझ्याबाबतीत षडयंत्र सुरु आहे", अफेअरच्या चर्चेनंतर गोविंदाचे पत्नीवर गंभीर आरोप, म्हणाला, "ही संपत्ती आणि प्रसिद्धी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.