आज एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली की ती पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरते. दोन दिवसांपासून अभिनेता ललित प्रभाकरच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. पाठमोऱ्या मुलीसोबतचा एक फोटो त्याने पोस्ट केला होता आणि त्यात ओळखा पाहू असं कॅप्शन दिल होत. त्याच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता मात्र या पोस्टमागचं गुपित उलगडलं असून ललित सोबत असलेली ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिंकू राजगुरू आहे. ललितने रिंकूसोबतचे एक फोटोशूटचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले असून लवकरच ते दोघे पहिल्यांदा एका सिनेमात झळकणार असल्याचं सांगितलं आहे.(Lalit Prabhakar and Rinku Rajguru)

रविवारी आयोजित एका बैलगाडा शर्यतीत त्याने ही घोषणा नेमकी काय आहे, याचा उलगडा केला. त्यांचा आगामी सिनेमा ‘खिल्लार’मध्ये ही जोडगोळी पाहायला मिळणार आहे. नुकतंच खिल्लारचे पोस्टरही समोर आले आहे. ललित आणि रिंकूचा आगळावेगळा अंदाज मोठया पडद्यावर एकत्र पाहणं रंजक ठरेल.
पहा कोण आहे ललिताची मिस्ट्री गर्ल (Lalit Prabhakar and Rinku Rajguru)
गेल्या अनेक वर्षांपासूनची ही बैलगाडा शर्यतीची परंपरा गावोगावी जपलेली आहे. आता या बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपट गृहांमध्येही पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्यां खिल्लार या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, बैलगाडा शर्यतीचा धुरळा या सिनेमातून उडताना पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ललित प्रभाकर आणि रिंकू राजगुरू ही जोडी पाहायला मिळणार आहे. (Lalit Prabhakar and Rinku Rajguru)

आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे असल्याचं नेहमीच अधोरेखित करण्यात आलं आहे. बैलगाडा शर्यतींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उत्सुकता आपल्या राज्याइतकी इतर कुठे पाहायला मिळत असेल असं वाटत नाही.
ललित आणि रिंकूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची पोस्ट केली असून इतर कलाकार मंडळींनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. या फ्रेश जोडीला नव्याने रुपेरी पडद्यावर पाहायला चाहते ही उत्सुक असल्याचं दिसतंय.
