९० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडवर राज्य केलं. यापैकी एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रेखा. जी आज पडद्यापासून दूर असली तरी एकेकाळी तिने आपल्या अभिनयाने व नृत्याने लोकांना वेड लावलं होतं. हे नाव इतर कोणा अभिनेत्रीचं नसून एकेकाळी लाखो हृदयांची धडधडं असलेल्या रेखाचं आहे. रेखाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करुन तिच्या करिअरला चालना दिली पण खऱ्या आयुष्यात मात्र ती कमी पडली आणि स्वतःचे घर बनवू शकली नाही. (Rekha Vinod Mehra Lovestory)
रेखाचे लग्न प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी झाले. रेखा विनोद मेहरा यांची तिसरी पत्नी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा व विनोद यांनी गुपचूप लग्न केले आणि लग्नानंतर अभिनेत्री जेव्हा तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिचं चपलीने स्वागत केलं. सासरच्या घरी जेव्हा रेखा तिच्या सासूबाईंच्या म्हणजेच विनोद मेहरा यांच्या आईच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली तेव्हा त्यांना खूप राग आला होता.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, विनोद मेहरा यांच्या आईला रेखा आवडत नव्हती आणि जेव्हा तिचा मुलगा तिला सून म्हणून घरी घेऊन आला तेव्हा तिने अभिनेत्रीला मारहाण करण्यासाठी चप्पल उचलली. विनोदच्या आईच्या या वागण्याने रेखाला खूप दुःख झाले. लग्नानंतर काही काळातच रेखा व विनोद यांच्यात तणाव निर्माण झाला आणि दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
रेखापासून विभक्त झाल्यानंतर विनोद मेहरा यांनी चौथ्यांदा घर बसवलं. त्यांनी त्यानंतर किरण मेहरा यांच्याशी लग्न केले. वयाच्या ४५ व्या वर्षी किरण यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर रेखाने बिझनेसमन मुकेश अग्रवालसह लग्न केले. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर मुकेशने आत्महत्या केली.