मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक उत्तम कलाकारांचा वारसा लाभला आहे या कलाकारांच्या यादीमधील एक महत्वाचं नाव म्हणजे जेष्ठ अभिनेते दादा कोंडके. विनोदाचं अचूक टायमिंग, उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन या गोष्टींमध्ये हातखंडा असलेले दादा कोंडके त्यांच्या विलक्षण कल्पनाशक्ती आणि त्यातून निर्मिती होणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जायचे. दादांसह काम केलेल्या अनेक कलाकारांनी दादांचे अनेक किस्से प्रेक्षकांबरोबर शेअर केले आहेत. आज दादांचा जन्मदिवस त्यानिमित्त जाणून घेऊयात दादांच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या एका सदाबहार गाण्यामागच्या निर्मितीची कथा. महाराष्ट्रात जल्लोष म्हणलं कि अनेक गाणी वाजवली जातात या गाण्यांमध्ये समाविष्ट असलेलं एक गाणं म्हणजे ‘ढगाला लागली कळ’. आज ही हे गाणं तेवढ्याच उत्साहात सगळीकडे ऐकलं जातं. या प्रसिद्ध गाण्याचे लेखक, दिग्दर्शक हे दस्तुरखुद्द दादा कोंडकेच आहेत. या गाण्याच्या शब्दां इतकंच गाणं कसं तयार झाला या मागेही हटके गोष्ट आहे. (dada kondke)
दादा कोंडकेंच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे सोंगाड्या. सोंगाड्या चित्रपटातील वर ढगाला लागली कळ हे गाणं देखील चांगलंच गाजलं. दादा कोंडके यांनी त्यांच्या एका जुना मुलाखतीमध्ये या गाणाच्या निर्मितीचा किस्सा सांगितला होता. दादांनी सांगितल्या प्रमाणे कोल्हापूरच्या राधानगरीच्या जंगलात दादा व त्यांचे सवंगडी शिकारीला गेले होते. दिवसभर शिकार करून देखील हाती काही लागलं नाही. रात्री जंगलात विसावा घेत दादा आणि त्यांचे सवंगडी झोपी गेले. सकाळी दादांना जाग आली तेव्हा डोळ्या समोर एक काळा ढग दिसला आणि त्यातून थेंबगळ सुरु झाली त्यावेळी दादा अचानक ‘वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ’ हे वाक्य सहज बोलून गेले आणि त्यांच्या सवंगड्यांनी ही त्यावर दादांना दाद दिली. दादा कोंडके यांनी त्यावरून घरी जाता जाता पूर्ण गाणं लिहून काढलं आणि त्यांच्या सोंगड्या या चित्रपटात हे गाणं त्यांनी वापरलं.
हे देखील वाचा- Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…
आज ही हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडतं. दादा कोंडके यांनी त्यांच्या चित्रपटाच्या कथेसह त्यांच्या चित्रपटातील गाण्यांवर ही तेवढाच भर दिला त्यामुळे चित्रपटासह त्यामधील गाणी देखील चांगलीच गाजली. दादा कोंडके यांच्या काम करण्याच्या याच पद्धतीमुळे त्यांना अभिनयाचं चालत बोलतं विद्यापीठ मानलं जायचं. सेन्सॉर बोर्डला देखील डोकं फोडायला लावणारे दादा कोंडके ओळखले जायचे त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाच्या नावासाठी. तर चित्रपटातील गाणी हे दादांच्या चित्रपटांच्या यशाचा एक अमूलाग्र भाग असायची याचं गाण्यांमधलं एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणजे ‘ढगाला लागली कळं’. (dada kondke)
हे देखील वाचा- सासूबाईंना काकू का म्हणते मुग्धा वैशंपायन?, प्रथमेश लघाटेही बायकोच्या आईला म्हणतो मावशी, म्हणाली, “तो माझ्या आई-बाबांना…”
दादा कोंडके यांनी ‘सोंगाड्या’,’पांडू हवालदार’,’राम राम गंगाराम’,’वाजवू का’,’येऊ का घरात’,’पळवा पळवी’,’अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे’ अशा अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांच मनोरंजन केलं. तसेच अनेक लोकनाटयांच्या माध्यमातून देखील दादा कोंडके यांनी समाज प्रबोधन व मनोरंजनाच उत्तम काम केलं. अशोक सराफ, निळू फुले, यांसारख्या अनेक कलाकारांनी त्याकाळी दादा कोंडके यांच्यासह काम करून मराठी चित्रपट गाजवले.