Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या भागात एकापेक्षा एक स्पर्धक असल्यामुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे छोटा पुढारी फेम घनश्याम दरवडे याने. गेले काही दिवस ‘बिग बॉस’चा छोटा पुढारीने खूपच चर्चेत आहे. घरातील सर्वांबरोबर त्याची चांगली वागणूक आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह घरातील सर्वांचा तो आवडता झाला आहे. त्याचं सध्या निक्कीशी चांगलंच जमत आहे. (Bigg Boss Marathi 5 update)
घन:श्याम हा प्रत्येक खेळात सहभागी होत असून प्रत्येक कार्यात तो अगदी हिरीरीने सहभाग घेत आहे. त्याममुळे ‘बिग बॉस’च्या घरात सध्या त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच त्याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यातून त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये छोटा पुढारीचा व निक्की तांबोळीची मजामस्ती पहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये निक्की बाईऽऽऽ असं म्हणत आहे. या प्रोमोमधून तो सर्वांशी प्रेमाने वागत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच या नवीन प्रोमोमध्ये निक्की त्याच्या गालावर किस करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…
घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा हा नवीन प्रोमोदेखील सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. ‘बिग बॉस’ टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.
दरम्यान, या घरात काल कॅप्टन्सीवरुन नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि घनःश्याम दरवडे या स्पर्धकांना बहुमताने नॉमिनेट करण्यात आलं. हे सहा सदस्य आता घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या आठडव्याच्या शेवटी घरात एलिमिनेशन पार पडणारे आगे