मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे त्यांच्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्यांनी विविध धाटणीचे चित्रपट बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह त्यावर व्यक्त होण्यास भाग पाडले. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’सारखे सुपरहिट चित्रपट देणारे रवी जाधव यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येसुद्धा आपला स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीतील हा प्रसिद्ध चेहरा नुकतंच एका कारणांमुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘ताली’ ही हिंदी वेबसिरीज. (Ravi Jadhav Taali Webseries)
रवी जाधव यांनी ‘ताली’ वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. ज्यात अभिनेत्री सुश्मिता सेनसह अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. या वेबसीरिजमधील सर्वच कलाकारांचे प्रचंड कौतुक होत आहे. शिवाय लेखन व दिग्दर्शनाचेही कौतुक होत आहे. पण रवी जाधव यांना ही वेबसीरिज खरंतर मराठी चित्रपट म्हणून करण्याचे ठरवले होते. त्याचे कथानकसुद्धा तयार होती. पण जेव्हा निर्मात्यांना ही वेबसीरिजच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणायची असल्याने अखेर रवी जाधव यांनी ही वेबसीरिज हिंदीमध्ये आणली व ती प्रचंड गाजली. (Ravi Jadhav Taali Webseries)
खुद्द दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटानंतर मी एकही चरित्रपट केला नव्हता. त्यामुळे मी चांगल्या गोष्टीच्या शोधात होतो. क्षितिज पटवर्धन यांनी जेव्हा ही संकल्पना मला सांगितली, तेव्हा सुरुवातीला हा मराठी चित्रपट करण्याचे मी ठरवले होते. पण नंतर निर्मात्यांनी ही कथा ऐकली तेव्हा ही गोष्ट संपूर्ण देशाला समजली पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यामुळे ही वेबमालिका हिंदी भाषेत करण्याचा निर्णय घेण्यात आला.”
अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित या वेबसीरिजमध्ये कृतिका देव, सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, नंदू माधव यांसारखे अनेक मराठी कलाकार झळकले आहे. वेबसीरिजचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे.