शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”, मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 23, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravi Jadhav, Sameer Vidwans, Saie Tamhankar, Siddharth Chandekar supported the trolling of Chinmay Mandalakar

“घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना…”, मराठी कलाकारांचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा व कारवाईची मागणी, म्हणाले, “आम्ही विनंती करतो की...”

मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकाराणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आपल्या विविधांगी भूमिकांनी चर्चेत असणारा हा अभिनेता सध्या त्याच्या काही वैयक्तिक कारणांनी चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत भविष्यात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे म्हटले आणि यांचे कायारण म्हणजे चिन्मयच्या कुटुंबियांवर सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग.

चिन्मयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं. या व्हिडीओद्वारे चिन्मयने “यापुढे मी कधीही महाराजांची भूमिका करणार नाही” असं म्हटलं. त्यामुळे अभिनेत्याच्या या निर्णयावर त्याच्या अनेक चाहते मंडळींसह मराठी मनोरंजन विश्वातील  अनेक कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. “हा निर्णय मागे घे”, असं म्हणत अनेक चाहते अभिनेत्याला विनंती करताना दिसत आहेत. तसेच रवी जाधव, समीर विद्वांस, अक्षय वाघमारे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि गौतमी व मृण्मयी देशपांडे  यांनी चिन्मयच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

आणखी वाचा – “घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्यांना…”, चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका करण्यास नकार देताच सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट, म्हणाला…

रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “मी नेहा व चिन्मयच्याबरोबर असून एक भारतीय म्हणून सायबर सेल व महाराष्ट्र सरकारकडे त्याला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती करत आहे. यासह चिन्मयने आपला निर्णय मागे घ्यावा असंही म्हटलं आहे. तर समीर विद्वांसने याबद्दल त्याचं मत व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “हे खूप जास्त दुर्दैवी आहे. महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही.” तसेच समीरने या सर्व प्रकरणात चिन्मयसह त्याच्या पत्नी व मुलाला पाठिंबा देत चिन्मयला “एक कलाकार म्हणून ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करत आहेस ती करत राहावी” अशी विनंतीदेखील केली आहे.

आणखी वाचा – शशांक केतकरला पाहून चाहत्यांचा आनंद अनावर, सफाई कर्मचारी महिलांना भेटला अन्…; अनुभव शेअर करत म्हणाला, “रोज रस्ता झाडून…”

याचबरोबर सिद्धार्थने “जहांगीर नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही” असं म्हटलं आहे तर गौतमीने “कलाकारांना सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर काहीतरी चांगलं मिळण्याची लोकांची लायकी नाही” असं म्हणत तिचा संताप व्यक्त केला आहे. तर सईने “हे खूपच विचित्र व दुर्दैवी आहे आणि मी तुझ्या बाजूने आहे” असं म्हणत चिन्मयला पाठिंबा दिला आहे. यांसह मृण्मयीनेही “अजून किती सहन करायचं?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.     

Tags: chinmay mandlekarChinmay Mandlekar Troll Newsmarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi Actress Radhika Deshpande shared a special post on Instagram related to Mangalsutra see the details

“मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार”, मंगळसूत्रावरील चर्चांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, पोस्ट करत म्हणाली, “लग्न संस्कृती...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.