असं म्हणतात जोड्या देवाच्या घरूनच बनून येतात. त्यामुळे कोणाचा जोडीदार कुठे सापडेल हे सांगता येणं कठीण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. काहींनी आपल्याच क्षेत्रातले जोडीदार निवडले तर काहींनी सर्वसामान्य व्यक्तीसोबत आपला संसार सुरु केला. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास करून स्वतःच करियर घडवणारी अभिनेत्री रसिका सुनील हिला आदित्य बिलागी सोबत लग्न गाठ बांधून एक वर्षापेक्षाही अधिक काळ झाला आहे. सध्या रसिका पती आदित्य पासून कामानिमित्त लांब राहत आहे. अशातच तिने पती आदित्यला गिफ्ट पाठवल्याची पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. (Rasika Aditya long distance)

हे देखील वाचा: “ढाप माझे कपडे..”,फोटो पाहून चिडली गौतमी
या स्टोरीवर रसिकाने इमेजेटली स्टार्टींग कराईन्ग, सिईंग दिस व्हिडीओ, असं म्हणून तिने त्यांचा मित्र अमोल काळे याला थँक्स म्हंटल आहे. आणि पुढे तिने “लॉन्ग डिस्टंस मॅरेग सर्प्राइजेस, लव्ह यु” असं तिचा पती आदित्य बिलागीला म्हंटल आहे. रसिका आणि आदित्य च लव्ह मॅरेज झालं आहे. रसिका आणि आदित्य पहिल्यांदा एकमेकांना यु एस मध्ये भेटले होते. रसिकाने या नात्यात जास्त रस दाखवला होता. रसिकाच्या पतीला डान्सची आवड आहे, त्याचा डान्सचा एक वायरल व्हिडीओ रसिकाने पहिला होता आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
हे देखील वाचा: अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील ‘हा’ अभिनेता लवकरच होणार बाबा
आदित्य आणि रसिका यांचा एक म्युचल फ्रेड असल्यामुळे हे नातं पुढे जायला मदत झाली. आदित्यने सुरुवातीला या नात्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला न्हवता. परंतु काही कळांनंतर आदित्यला रसिकांवर असलेले प्रेम जाणवू लागल्यानंतर तो रसिकाला भेटायला मुंबई मध्ये आला होता. तिच्याकडे एक दिवस राहिल्यानंतर त्याने रसिकाला त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. आदित्य आणि पुढे जाऊन या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. आणि नंतर रसिका आणि आदित्यने एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. (Rasika Aditya long distance)

तसेच रसिकाला सुद्धा डान्स ची भयंकर आवड असल्यामुळे, रसिकाला पहिल्यांदा पती आदित्यच्या डान्सवर प्रेम झालं. आणि नंतर त्याच्यावर, रसिका लवकरच आपल्याला फकाट या मराठी सिनेमात दिसणार आहे.