Nikhil Chavan and Anushka Sarkate : मराठी अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर धामधूम पाहायला मिळाली. बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाने सोशल मीडियावर तुफान राडा घातला. अगदी राजेशाही थाटामाटात निखिल आणि अनुष्का यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल झाल्याचे पाहायला मिळालं. संभाजीनगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये निखिल आणि अनुष्काचा विवाह सोहळा पार पडला. निखिल आणि अनुष्काच्या विवाह सोहळ्याला सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
इतकंच नाहीतर राजकीय क्षेत्रातीलही बरेच दिग्गज मंडळी या विवाह सोहळ्यास उपस्थित होती आणि अनुष्का आणि निखिल यांना आशीर्वाद देताना दिसली.
लग्नानंतर सरकटेंची लेक चव्हाण यांची सून म्हणून त्यांच्या घरी पाऊल टाकताना दिसली. निखिलच्या घरी म्हणजे अनुष्काच्या सासरी तिचं अगदी पारंपरिक अंदाजात गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी निखिलच्या नव्या घराची झलक ही पाहायला मिळाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुंदर सजावट असलेल्या निखिलच घर साऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसलं. फुलांच्या पायघड्या घालून अनुष्काचं चव्हाणांच्या घरी स्वागत केलं.
आणखी वाचा – “चॉकलेट बॉय आता अजमल कसाबच्या भूमिकेत”, मराठी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच थक्क, तर उज्ज्वल निकम…
लग्नानंतर निखिल व अनुष्काने तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेतले. जोड्याने जाऊन त्यांनी त्यांच्या कुलदेवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर चव्हाणांच्या घरीही निखिल आणि अनुष्काच्या लग्नानंतरचा गोंधळ घालण्यात आला. या गोंधळात अनुष्का आणि निखिल थिरकताना दिसले. त्यांचा व्हिडीओ तुफान वायरल होतोय. सध्या हे जोडपं लग्नानंतरच्या विधींचा आनंद लुटताना दिसत आहे.




