विविध कारणांनी सतत प्रकाशझोतात असणारी अभिनेत्री राखी सावंतला मातृशोक झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राखीची आई जया सावंत(Rakhi sawant mother dies) या ब्रेन ट्युमर या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. राखी मागील काही दिवसांपासून त्यांच्या आजाराची अपडेट देत होती.राखीने तिच्या चाहत्यांना आईच्या तब्यतेसाठी प्रार्थना करण्याचे आव्हान सुद्धा केले होते.राखीचे पती आदिल यांनी ही बातमी सत्य असल्याची पुष्टी केली आहे.(Rakhi sawant mother dies)

राखीने याआधी ही आईच्या या आजाराची माहिती प्रेक्षकांना दिली होती. अभिनेता सलमान खान ने ही राखीच्या आईच्या उपचारासाठी प्रार्थना आणि मदत केली होती. परंतु आज राखीची आई जया सावंत यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. राखी नेहमी काही कारणास्तव मीडिया मध्ये चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी मराठी बिग बॉस मध्ये दिसली होती. मराठी बिग बॉसचा हा सिझन संपताच तिला आईच्या तब्यतीची माहिती मिळाली आणि तिने तात्काळ हॉस्पिटल जवळ केले होते. मात्तृ शोकाच्या बातमीने राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समस्त इंडस्ट्री राखीच्या या दुःखात सहभागी होताना दिसत आहे.

राखीच्या आई जया सावंत यांच्या आत्म्यास शांत लाभो.