Bigg Boss Marathi 6 : सिझन ६ सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक दिवसात घरातील वाद, टास्क आणि स्पर्धकांमधील मतभेद यामुळे वातावरण तापताना दिसत आहे. अशातच आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमुळे घरातील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ने राखीला घराची राणी बनवल्याचं दाखवण्यात आलं आहे. घराची राणी बनताच राखी सदस्यांना त्यांच्या ड्युटी व्यवस्थित पार पाडण्याचे आदेश देताना दिसते. ती प्राजक्ताला घरात झाडू मारण्यास सांगते. मात्र प्राजक्ता याला विरोध करत, “मी एकटीच संपूर्ण घर साफ करणार नाही,” असं स्पष्टपणे सांगते.
प्राजक्ताच्या या उत्तराने राखी संतापते. “आज माझं डोकंच फिरलंय,” असं म्हणत ती प्राजक्तावर गव्हाचं पीठ फेकते. हा प्रकार पाहून घरातील इतर सदस्यही चांगलेच संतापतात. सचिन राखीला सुनावत म्हणतो, “तू जे काही केलंस ते सगळं आत्ताच साफ कर.” सागरही तिच्यावर नाराजी व्यक्त करत, “हे पीठ टाकायचं असेल तर घरी टाक, इथे नाही,” असं म्हणतो.
आणखी वाचा – सलमान खानचे वडील रुगालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर; चाहत्यांत चिंतेचे वातावरण
त्यावर राखी सागरला “तोंड बंद कर” असं म्हणते, तर सागरही तिला “तू गप्प बस” असं प्रत्युत्तर देतो. वाद इतक्यावर थांबत नाही. पुढे राखी सर्व सदस्यांना उद्देशून, “तुम्ही सगळे माझ्या पायाखाली आहात,” असं म्हणते. हे ऐकताच सचिनचा राग अनावर होतो आणि तो राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकतो. या सर्व प्रकारामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वातावरण आणखी तापणार असल्याचं दिसत आहे. आता राखी खरंच घरातील सदस्यांकडून ड्युटी करून घेऊ शकेल का?, की या वादामुळे परिस्थिती आणखी बिघडेल?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा – सलमान खानचे वडील रुगालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर; चाहत्यांत चिंतेचे वातावरण





