शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तस्करी’ फेम मराठी अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन, वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलमान खानसह केलेलं काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 18, 2026 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Pravina Deshpande death

'तस्करी' फेम मराठी अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन, वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलमान खानसह केलेलं काम

Pravina Deshpande death : बॉलिवूडमधून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीणा देशमुख यांचे निधन झाले आहे. ‘रेडी’ चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. अलीकडेच त्या इमरान हाश्मी स्टारर नीरज पांडेच्या ‘तस्करी’ या मालिकेतही दिसल्या होत्या. प्रवीणा देशपांडे बॉलीवूड तसंच मराठी चित्रपटसृष्टीतही खूप प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून, शोककळा पसरली आहे. प्रवीणा यांनी १७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या.

प्रवीणा देशपांडे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली. दिवंगत अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबीयांनी लिहिले की, “अत्यंत दुःखाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की, श्रीमती प्रवीणा देशपांडे यांचे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता हिंदू स्मशानभूमी, चकाला पारशीवाडा, अंधेरी पश्चिम येथे पार पडले. प्रवीणाच्या कुटुंबीयांची नावेही लिहिली आहेत. १७ फेब्रुवारीला प्रवीणा यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा – राखीने पुन्हा ‘बिग बॉस’ची प्रॉपर्टी तोडली; प्राजक्तावर पीठ फेकलं, खुर्ची पाडली अन्…; घरात मोठा राडा

View this post on Instagram

A post shared by Pravina Deshpande (@pravinadeshpande)

प्रवीणा देशपांडे यांना मल्टिपल मायलोमा, जो ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे, ज्याने त्या २०१९ पासून त्रस्त होत्या. याच काळात त्यांची प्रकृती खराब झाली होती. केमोथेरपीमुळे प्रवीणाच्या त्वचेवर पुरळ उठू लागले आणि तिच्या पाठीतही खूप दुखू लागले. त्यांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटही झालं. प्रवीणा देशपांडे यांनी २०२४ मध्ये ‘ईटाईम्स’ला सांगितले होते की, कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी त्यांच्या त्वचेवर पुरळ उठू लागले होते, जे हळूहळू पसरत गेले. त्या म्हणाल्या होत्या, “याची सुरुवात त्वचेवर लहान पिंपल्सपासून झाली आणि नंतर हळूहळू पसरली. त्यानंतर २०२२ मध्ये, उपचारांच्या पहिल्या फेरीनंतर, मला तीव्र पाठदुखीचा अनुभव आला, ज्यामुळे मला असे वाटले की उपचार सुरु करण्याची वेळ आली आहे. मी सप्टेंबरमध्ये वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आणि त्याच महिन्यात मला केमोथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर माझे बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाले”.

आणखी वाचा – सलमान खानचे वडील रुगालयात दाखल; आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती समोर; चाहत्यांत चिंतेचे वातावरण

प्रवीणा यांनी ‘रेडी’ व्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि वेबसिरीज केल्या, त्यात ‘बॉम्बे टॉकीज’, ‘डी-डे’, ‘मान्सून शूटआउट’, ‘एक व्हिलन’, ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘गब्बर इज बॅक’, ‘अलिगढ’ आणि ‘ब्लॅकमेल’ सारख्या नावांचा समावेश आहे. अलीकडेच त्या नीरज पांडेच्या ‘तस्करी’ या मालिकेत परदेशातून घड्याळांची तस्करी करणाऱ्या प्रवाशाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांच्या भूमिकेची चांगलीच दखल घेतली गेली. याशिवाय प्रवीणा यांनी ‘द फॅमिली मॅन ३’ मध्ये मनोज बाजपेयींच्या आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी केमोथेरपीमुळे त्यांचे केस गळले होते, त्यामुळे अभिनेत्रीने शूटिंगदरम्यान विग घातला होता.

Tags: entertainmentmarathi actressPravina Deshpande
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
Sidharth Malhotra father death

सिद्दार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनाने अभिनेता भावुक, म्हणाला, "आम्हाला झोपेत सोडून गेलात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.