मुंबईत मध्यरात्री सुरु झालेल्या पावसाने पहाटेनंतर उसंत घेतला. असं असलं तरी अद्याप काही भागात सरी कोसळत आहे. अशातच आता दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, कुलाबा व भायखळा परिसरात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली असून उपनगरातील अंधेरी, वांद्रे परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. (Pooja Sawant On Mumbai Traffic)
शहरांतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईची वाहतूक खोळंबली आहे. कित्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व रेल्वे धिम्या गतीने चालू आहेत. यामुळे मुंबईकरांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पावसाचा फटका कलाकार मंडळींनाही बसला आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने पावसामुळे झालेल्या ट्राफिकमुळे पोहोचायला उशीर झाल्याने तिने संताप व्यक्त केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.

पूजा सावंतने आजवर तिच्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही पूजा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “गोरेगांवहुन दादरला पोहोचायला मला दोन तास दहा मिनिटे लागली. आणि अजूनही मी मला ज्या ठिकाणी मला जायचे आहे त्या ठिकाणी मी पोहोचलेले नाही”, असं म्हणत पूजाने खास व्हिडीओ शेअर करत पावसामुळे होणाऱ्या तारंबळेबाबत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – कधीच आई होऊ शकणार नाही राखी सावंत, अभिनेत्रीला दुःख अनावर, म्हणाली, “विकी डोनरसारखं…”
कामाच्या निमित्ताने निघालेली पूजा मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकली. याचबरोबर तिने पावसाचा व्हिडीओही शेअर केला आहे. पूजा तिच्या लग्नामुळे चर्चेत राहिली. लग्नानंतर ती तिच्या सासरच्या कुटुंबाबरोबर वेळही घालवताना दिसली. पूजाचा नवरा हा कामानिमित्त ऑस्ट्रेलिया येथे स्थित आहे. तर सध्या पूजा तिच्या करिअरसाठी ऑस्ट्रेलियाहुन मुंबईत परतली आहे.