मराठी मनोरंजनसृष्टीतील रिअल लाईफ जोडी श्वेता मेहेंदळे व राहुल मेहेंदळे अभिनयासह विविध कारणांनी चर्चेत राहते. झी मराठीवर सुरु असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ही जोडी एकत्र काम करताना दिसत आहे. राहुल अद्वैतच्या वडिलांची, तर श्वेता इंद्राणीच्या भूमिकेत दिसते. दोघंही मालिकेत परस्परविरोधी भूमिका साकारत असले, तरी दोघांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. विशेष करून, श्वेताचं नकारात्मक पात्र प्रचंड गाजलं. गेली अनेक वर्ष हे दोघे अभिनय सृष्टीत सक्रिय आहे. काही वर्षांपूर्वी या जोडीचं लग्न झालं असून लग्नानंतरही हे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना दिसले. (Rahul and Shweta Mehendale share a Wedding Anniversary video)
श्वेता आणि राहुल हे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त राहुलने नुकतंच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने श्वेताबरोबरचे अनेक जुन्या फोटोजचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना दोघांनी त्यांच्या जुन्या आठवणी जाड्या केल्या. हा व्हिडीओ शेअर करताना राहुलने “या संपूर्ण प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद श्वेता”, असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – घटस्फोटादरम्यान करवा चौथ केल्याबाबत नको नको ते बोलले, पण मानसी नाईकने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “नव्या नवरीला…”
राहुलच्या या व्हिडीओवर ऐश्वर्या नारकर, अश्विनी महांगडे, सुकन्या मोने, सुनील बर्वे व मनोरंजन सृष्टीतील इतर कलाकारांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनीही या व्हिडिओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. २० वर्षांपूर्वी एका मालिकेच्या शूटदरम्यान श्वेता व राहुल एकमेकांना भेटले आणि दोघांच्या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. या २० वर्षांच्या काळात दोघांनी एकमेकाला उत्तम सांभाळून घेतलं.
हे देखील वाचा – अभिमानास्पद! तीन मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
दरम्यान, काही वर्षांपूर्वी राहुलला ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळेस त्याला बोलणेही कठीण झालं होतं. मात्र, या कठीण काळातही श्वेताने राहुलला साथ दिली. ज्यामुळे तो या गंभीर आजारातून बारा झाला, आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. सध्या राहुल या मालिकेबरोबर ‘खरं खरं सांग’ नाटकातही काम करताना दिसत आहे. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे अनेक व्हिडीओज नेहमी चर्चेत असतात.