अनेक रिऍलिटी शोचा चेहरा म्हणून राहुल महाजन याकडे पाहिलं जात. राहुल महाजन याच्या खऱ्या आयुष्याबाबतचा एक मोठा निर्णय नुकताच समोर आला आहे. राहुल त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे. राहुल कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत लग्नबंधनात अडकला होता आणि आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इटाईम’च्या वृत्तानुसार, लग्न केल्यानंतर चार वर्षांनी या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता एका सूत्राने याला दुजोरा दिला आहे. याआधी राहुल महाजनचे डिंपी गांगुलीशी लग्न झाले होते आणि त्याने तिच्यापासून घटस्फोटही घेतला होता. (Rahul Mahajan Divorce)
या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने ‘इटाईम्स’ला सांगितले की, ‘सुरुवातीपासून दोघांमध्ये अनेक वाद होते. तथापि, त्यांनी शक्य तितके त्यांच्या लग्नावर ओढले. गेल्या वर्षी ते वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याने गेल्या वर्षी कागदपत्रे दाखल केली होती, घटस्फोट झाला आहे की प्रक्रिया सुरू आहे हे अद्याप स्पष्ट नाही. नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी होती.
पाहा का होतोय राहुल महाजन आणि नताल्या एलिनाचा घटस्फोट (Rahul Mahajan Divorce)
यापूर्वी २००६ -२००८ मध्ये श्वेता सिंगसोबत आणि नंतर डिम्पी गांगुलीशी राहुलने लग्न केले होते, ज्याची भेट ‘राहुल दुल्हनिया ले जायेगा’ या रिऍलिटी शोमध्ये झाली होती. डिम्पी आणि राहुलने २०१० मध्ये लग्न केले आणि २०१५ मध्ये ते विभक्त झाले.
हे देखील वाचा – किसींग सीन वरून होणाऱ्या टीकेवर धर्मेंद्र यांनी सोडलं मौन म्हणाले, “आम्हाला किसींग सीन करताना…”
अदयाप राहुल महाजन यांने या वृत्ताला नकार देत काहीही भाष्य केलेलं नाही आहे, तो म्हणाला, ‘मला माझे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायचे आहे. मला कशावरही भाष्य करायला आवडणार नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे यावर मी माझ्या मित्रांशी बोलतही नाही. नताल्या इलिनाने देखील यावर काहीही सांगितले नाही. राहुल रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या अनेक सीझनमध्ये दिसला आहे आणि तो नताल्यासोबत शेवटचा ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसला होता.
