मराठी चित्रपट सृष्टी असो किंवा हिंदी कलाकाराला प्रत्येक ठिकाणी ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. सध्या किसिंग सीन वरून चांगलेच चर्चेत आहेत अभिनेत्रे धर्मेंद्र व अभिनेत्री शबाना आझमी. रणवीर सिंग, आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला रॉकी और राणी कि प्रेम कहाणी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. गाणी, अभिनय या सोबतच चित्रपट चर्चेत आहे तो म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे. काही दिवसांपूर्वी धमेंद्र व शबाना यांचा एक किसिंग सीन चांगलाच चर्चेत होता त्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. चाहत्यांच्या या ट्रोलिंगवर अखेर धर्मेंद्र यांनी मौन सोडलं आहे. (dharmendra and shabana azmi kissing)
न्युज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते धर्मेंद्र खुलासा करत म्हणाले “माझ्या आणि शबानाच्या किसिंग सीनने चाहत्यांना आश्चर्यचकित केल्याचं दिसतंय. मला वाटतंय लोकांना या सीन बद्दल कल्पना नसावी पण अचानक हा सीन पाहिल्यामुळे त्याचा प्रभाव जास्त होता. या आधी मी “लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटात देखील किसिंग सीन दिला होता त्यावेळी लोकांनी त्याचं कौतुक देखील केलं होतं.”(dharmendra shabana azmi)
रोमान्सला कोणतंही वय नसतं (dharmendra and shabana azmi kissing)
“रॉकी ओर राणी कि प्रेम कहाणी या चित्रपटातील या सीन बद्दल जेव्हा करणने सांगितलं तेव्हा मला वेगळा असा काही उत्साह न्हवता. आम्हला हे समजत होतं कि चित्रपटाच्या कथे नुसार हे गरजेचं आहे. आणि हे करावंच असा आग्रह देखील न्हवता. आणि मला असं वाटत रोमान्सला कोणतंही वय नसतं. शबाना आणि मला हा सीन करताना कोणत्याही प्रकारचा संकोच वाटला नाही.” असं देखील धर्मेंद्र या मुलाखतीत म्हणाले.
धमेंद्र आणि शबाना यांच्या या किसिंग सीन वर प्रेक्षकांनी “या वयात तुम्हाला हे शोभत का?”, “तुम्हाला हा सीन करताना काही वाटलं नाही पण बघताना आम्हाला काय वाटलं याचा तरी विचार करा” अशा कमेंट्स केल्या आहेत.