दिग्दर्शक पी. वासू यांचा २००६ मध्ये रिलीज झालेला “चंद्रमुखी” या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमातील नायक अभिनेता राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक समोर आला आहे. “चंद्रमुखी २” हा या फ्रेंचायझीचा दुसरा भाग असून पहिल्या भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते. तर दुसऱ्या भागात राघवसह बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत दिसणार आहे. (raghava lawrence chandramukhi 2)
सिनेमाच्या निर्मात्यांनी मुख्य नायकाचा फर्स्ट लुक समोर आणला आहे. या फर्स्ट लूकमध्ये अभिनेता राघव लॉरेन्स वेट्टीयन राजाच्या भूमिकेत दिसणार आहे. समोर आलेल्या या पोस्टरमध्ये राघव शाही अंदाजात दिसत असून तो राजवाड्याच्या पायऱ्यांवरून चालताना दिसत आहे. तसेच राघव राजाच्या पोशाखामध्ये खास त्याच्या अंदाजात दिसत आहे. (raghava lawrence chandramukhi 2 first look out)
पाहा “चंद्रमुखी 2” चा फर्स्ट लुक (raghava lawrence chandramukhi 2 first look out)
Back with double the swag and attitude! 😉 Witness Vettaiyan Raja's 👑 intimidating presence in @offl_Lawrence 's powerful first look from Chandramukhi-2 🗝️
— Lyca Productions (@LycaProductions) July 31, 2023
Releasing this GANESH CHATURTHI in Tamil, Hindi, Telugu, Malayalam & Kannada! 🤗#Chandramukhi2 🗝️
🎬 #PVasu
🌟… pic.twitter.com/nf7BHwi3x6
अभिनेत्री कंगनाची फर्स्ट लुक अद्याप समोर आला नसून ती यात नर्तिकेची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. सिनेमाची निर्मिती सुभास्करण करणार आहेत. तर संगीत ऑस्कर पुरस्कार विजेते व ‘RRR’ फेम संगीतकार एम.एम. किरवानी यांचे असणार आहे.
हे देखील वाचा : ‘जवान’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘जिंदा बंदा’ आलं प्रेक्षकांच्या भेटीस, स्टायलिश अंदाजातील शाहरुख खानच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष
“चंद्रमुखी २” हा २००६ साली रिलीज झालेल्या “चंद्रमुखी” सिनेमाचा सिक्वेल आहे. ज्याची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती आणि २०२२ च्या मध्यात चित्रपटाची सुरुवात झाली. आणि गेल्या जूनमध्ये सिनेमाचे शूटिंग संपले. हा सिनेमा येत्या गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबरला हिंदीसह तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. (raghava lawrence chandramukhi 2 first look out)
