कलाकार मंडळी हे त्यांच्या अभिनयातील एखाद्या पात्रामुळे वा विशेष डायलॉग्समुळे लोक्रिय असतात, तर काही कलाकार हे त्यांच्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात आणि लक्षत राहतात. नव्वदीच्या काळात सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्यालाही मागे टाकणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका मराठी अभिनेत्रीच नाव अग्रस्थानी होत. ते म्हणजे अभिनेत्री अर्चना जोगळेकर. (Queen of 80s faced worst things)
अभिनेत्री अर्चनाने हिंदी सिनेविश्वात आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. लांबसडक केस असलेली अभिनेत्री म्हणून अर्चना प्रेक्षकांमध्ये ओळखली जायची. मात्र बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेल्या अर्चना हिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. का ते चला जाणून घेऊयात आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा का सोडली अर्चना हिने सिनेसृष्टी (Queen of 80s faced worst things)
संसार, एकापेक्षा एक, बात है प्यार की, आतंक ही आतंक, स्त्री या चित्रपटांमधून अर्चन हिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. चित्रपटच नव्हे तर मालिकाविश्वातही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मात्र एका घटनेमुळे अर्चना हिने थेट सिनेविश्वच स्वतःपासून दूर लोटलं. अर्चना जोगळेकर या कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहेत. तिची आई आशा जोगळेकर यांच्याकडून तिला कथ्थकचे धडे मिळाले आहेत.(Queen of 80s faced worst things)
बॉलिवूडसोबतच अर्चना यांनी ओडिशा सिनेविश्वातही काम केलं आहे. सिनेसृष्टीत पदार्पण ही त्यांनी ओडिशा चित्रपटातूनच केलं. १९९७ मध्ये ओडिशामध्ये चित्रपटाचं शूटिंग करत असताना एका व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र अर्चना ही कशीबशी तिथून पळ काढण्यात यशस्वी झाली होती. यानंतर अर्चनाने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली होती. (Queen of 80s faced worst things)
हे देखील वाचा – ‘मला तो किळसवाणा वाटतो’ डिंपल यांनी नानांबद्दल केलं भाष्य
या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली. अभिनयसृष्टीला रामराम ठोकला असला तरी तिच्यातलं कला कौशल्य तिला शांत बसू देत नव्हतं. त्यामुळे अर्चना हिने न्यू जर्सी येथे कथ्थक नृत्य शाळा उभारली. सिनेमाविस्वासून दूर जाण्याचा निर्णय जरी अर्चनाने घेतला असला तरी तिने तिचा श्वास म्हणजेच नृत्य अद्याप जपलं आहे.