अंकिता आणि ओंकार मधील अफेअरच्या चर्चांना आलंय पुन्हा एकदा उधाण, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्याच्या घडीला सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. निखळ विनोद आणि विविध विषय ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. हास्य जत्रेतून आता पर्यंत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Samir Choughule MHJ)
विविध स्किट्स, निराळे विषय या सर्वांच्या मदतीने या कार्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात आपले चाहते निर्माण केले आणि आज परदेशात ही या कार्यक्रमाचे फॅन्स पाहायला मिळतात. परंतु महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील काही स्किट्स मधील दृश्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्या संदर्भात माफी मागत अभिनेता समीर चौगुलेने आपली बाजू मांडली आहे.
हास्यजत्रेतील एका स्किट दरम्यान समीर ने एक नृत्य प्रकार सादर केला होता त्या नृत्यावरून आदिवासी समाजातील लोकांनी आक्षेप घेतला. त्या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करत समीर ने सांगितले कि “काही दिवसांपासून एक जुनी क्लिप व्हायरल होते ज्या मध्ये तारपा नृत्य करतोय असं सांगतो. हा प्रकार यापुढे होणार नाही, अनावधाने झालेला हा प्रकार होता यामध्ये कोणाच्या हि भावना दुखावण्याचा आमचा हेतू न्हवता आणि तो कधीच नसतो. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. (Samir Choughule MHJ)
अभिनेता समीर चौघुलेने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत अनेक धमाल विनोदी स्किट्स सादर करून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. आणि त्याच प्रेमाचा आदर जपण्यासाठी समीरने प्रामाणिकपणे आदिवासी समाजाची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.