Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हा चित्रपट येत्या ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये दाखल होत आहे. पण थ्रीडी व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार नसल्याचे समोर आलं आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले की पुष्पा 2: द रुलची 3D आवृत्ती या आठवड्यात प्रदर्शित होणार नाही. म्हणजेच हा चित्रपट फक्त 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री शो प्रदर्शित होणार नसल्याचंही समोर आलं. याचा अर्थ ज्यांनी हिंदी आवृत्तीत चित्रपटाच्या मध्यरात्रीचा शो पाहायचा ठरवला होता, त्यांचे सगळे बेत आता उद्ध्वस्त झाले आहेत.
X वर पोस्ट करताना तरण आदर्शने लिहिले आहे की, ‘पुष्पा 2 ची 3D आवृत्ती या आठवड्यात प्रदर्शित होत नाही. पुष्पा 2 ची 3D आवृत्ती या गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) प्रदर्शित होणार नाही. 2D आवृत्ती ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल. याशिवाय, बुधवारी रात्री (४ डिसेंबर २०२४) पुष्पा 2 च्या हिंदी आवृत्तीसाठी मध्यरात्री शो होणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा – प्रमोद-विराजचा स्वत:च्याच ऑफिसमध्ये मोठा फ्रॉड, लीलाने समोर आणलं सत्य, आता एजे काय शिक्षा करणार?
#BreakingNews… 'PUSHPA 2' *3D VERSION* NOT RELEASING THIS WEEK… The *3D version* of #Pushpa2 will not release this Thursday [5 Dec 2024]… The *2D version* will arrive as scheduled on 5 Dec 2024.
— taran adarsh (@taran_adarsh) December 3, 2024
Additionally, there will be *no midnight shows* for the #Hindi version of… pic.twitter.com/AJn5T2LRtT
‘पुष्पा 2: द रुल’ची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसह अनेक गाणी प्रदर्शित झाली आहे. ‘अंगारो’, ‘किसिक’ आणि ‘पीलिंग्स’ सारखी गाणी यूट्यूबवर आधीच धुमाकूळ घालत आहेत. ‘पुष्पा 2: द रुल’ची ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरु झाली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत जगभरात ८० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी केली जात होती. हरियाणामध्ये ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल केसात आली. हरियाणातील हिस्सार या गावात चित्रपटाच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीत चित्रपटामुळे हिंदु भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात आले होते.