मुंबई नगरीत कुणीही माणूस उपाशी राहू शकत नाही, हे शहर, या शहराचे वातावरण कोणत्याही माणसाला एक नवीन सुरुवात करायला कायमच उमेद देत असते. या शहरात अनेक मंडळी रोज येतात आणि आपली नवीन सुरुवात करतात, अशाच एक आजी म्हणजे पार्बता नुटुरे. त्या ७० वर्षांच्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या मुंबईतील दादर या ठिकाणी छोटेखानी व्यवसाय करत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्या लहान मुलींच्या कपड्यांचा व्यसवाय करत आहेत. (Grandmother selling little girls clothes at 70)
पार्बता नुटुरे या मूळच्या नांदेडच्या आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून त्या विरार या ठिकाणी राहतात. विरारपासून दादरपर्यंत त्या रोज प्रवास करतात आणि या सगळं त्या एकटीने सांभाळत आहेत. त्यांचे पती या व्यवसायात त्यांना साथ देतात. या वयात लागणाऱ्या वैद्यकीय गरजेसाठी त्या या वयातही व्यवसाय करत असल्याचे सांगतात. अवघ्या १०० रुपयांपासूनचे लहान मुलींचे कपडे त्या विकतात. जन्मलेल्या बाळापासून ते वे वर्षे सहा असलेल्या प्रत्येकासाठी त्यांच्याकडे कपडे आहेत.
चिमूरड्यांसाठी गोंडस आणि छोटे फ्रॉक या आजींकडे मिळतात. त्याचबरोबर आजींचा चेहरा सतत हसरा असल्याने वयाच्या सत्तरीतसुद्धा हसतमुखाने या आजी त्यांचा हा छोटा स्टॉल चालवतात. कोणावरही अवलंबून न राहता स्वतःसाठी थोडे पैसे सुटावे म्हणून हा व्यवसाय त्यांनी सुरु केला आणि यात त्यांना चांगलेच यश मिळाले आहे. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ‘मज्जापिंक’ या युट्यूब वाहिनीशी शेअर केला आहे.
आणखी वाचा – प्रमोद-विराजचा स्वत:च्याच ऑफिसमध्ये मोठा फ्रॉड, लीलाने समोर आणलं सत्य, आता एजे काय शिक्षा करणार?
या पार्बता नुटुरे या आजींचे हे छोटे स्टॉल दादरमधील नंदा हॉटेल जवळ, रानडे रोड, सर्वोदय समोर आहे. दादर पश्चिम येथे आहे. कॉटन, पॉलिस्टर आणि कॉटन व पॉलिस्टर मिक्स असे अनेक रंगीबेरंगी कपडे त्या विकतात. लहान मुलींना आवडतील असे आणि आकर्षित करतील असे विविध रंगाचे व विविध आकारांचे कपडे त्या विकतात. त्यामुळे तुम्हाला लहान मुलींसाठी असे कपडे घ्यायचे असल्यास या आजींच्या स्टॉलला नक्की भेट द्या…