प्रसिद्ध बॉलिवूड व हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि जाऊबाई सोफी टर्नर यांनी घटस्फोट घेऊन त्यांचे नाते संपवले असल्याचे समोर आले आहे. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून मतभेद होते आणि याआधीही त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. आता प्रियांकाचा दीर जो जोनास आणि वहिनी सोफी यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोन्ही कलाकार वेगळे झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, सोफी आणि जो यांनी फ्लोरिडाच्या न्यायाधीशांबरोबर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. (Joe Jonas Sophie Turner Divorce)
३५ वर्षीय जो जोनासने सप्टेंबर २०२३ मध्ये कोर्टात सोफी टर्नरपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलींच्या संयुक्त कस्टडीची मागणी केली होती. सोफी व जो जोनास यांना व्हिला व डेल्फीन या दोन मुली आहेत. व्हिला ४ वर्षांची आहे तर डेल्फीन २ वर्षांची आहे. त्यांच्या मुलींच्या ताब्यासाठी जवळजवळ एक वर्षाच्या संघर्षानंतर, जो व सोफी आता अधिकृतपणे घटस्फोट घेत आहेत. दोघांमध्ये त्यांच्या मुलींचा ताबा आणि मालमत्तेची विभागणी याबाबतही चर्चा झाली.
one year ago today sophie turner and joe jonas spontaneously tied the knot after the billboard music awards in vegas inclusive elvis impersonator. talk about ICONIC pic.twitter.com/9OjJctD37W
— best of sophie turner (@badpost_sophiet) May 1, 2020
सोफी टर्नर आणि जो जोनास यांची भेट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली. सोफीने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, २०१६ मध्ये जोने तिला इन्स्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज पाठवला होता. दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या आणि नंतर त्यांची भेट झाली. सोफी व जो यांच्या वयात ७ वर्षांचा फरक आहे. सोफी जोपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे.
२०१६ मध्ये सोफी व जो एकमेकांना डेट करु लागले. २०१९ मध्ये, दोघांनी बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्सनंतर लास वेगास वेडिंग चॅपलमध्ये गुपचूप लग्न केले. पण आता लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांनी अधिकृत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर जो जोनासचे नाव अभिनेत्री लैला अब्दुल्लाबरोबर जोडले जात आहे. सोफी कथितपणे पेरी पीअरसनला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.