लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापटने रंगभूमी, रुपेरी पडदा व ओटीटी या सर्वच माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळाली आहे. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्याशिवाय, तिच्या फिटनेसबरोबर बोल्ड फोटोशूटचीही बरीच चर्चा होते. अभिनयाबरोबरच प्रिया नाट्यनिर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. त्याचबरोबर, ती विविध फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियाने उमेश कामतशी लग्न केलं आहे. तेव्हापासून हे दोघे विविध ठिकाणी फिरताना अनेकदा दिसतात. काही दिवसांपूर्वी प्रियाचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला असून या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. (Priya Bapat Bikini photoshoot)
रंगभूमीवर ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक सध्या सुरु असून नाटकाच्या प्रयोगासाठी प्रिया व उमेश अन्य कलाकारांसह ऑस्ट्रेलियाला गेलेले आहेत. या नाटकाच्या प्रयोगातून वेळ काढत हे कलाकार सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान, प्रियाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्यासह उमेश कामत, पल्लवी पाटील व आशुतोष गोखले हे कलाकार एका स्विमिंग पूलमध्ये धम्माल मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियाने बिकिनी परिधान केली असून हे फोटो शेअर करत ती म्हणाली, “हॉट लोकांसह हॉट-स्प्रिंग”.
हे देखील वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानने केली मोठ्या चित्रपटाची घोषणा, नावही ठरलं, म्हणाला, “खूप विचार करुन…”
दरम्यान, प्रियाची ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र कमेंट केली आहे. तर काहींनी तिच्या बिकिनीवरून तिला ट्रोल केले आहे. मात्र, एक नेटकरी यावर कमेंट करत म्हणाली, “नको ना एवढं नाही बघवत तुझी गोड इमेज तशीच राहूदे.”. तर दुसऱ्या नेटकरी म्हणाला, “बाॅलिवुड लोकांसारखे ओव्हर अॅक्टिंग करायला जाता, पण ते तुम्हाला शोभत नाही. जरी करायला गेलात तरी लोकांना कशासाठी दाखवता?”.
हे देखील वाचा – हेमांगी कवीला लॉट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसणार, फोटो शेअर करत म्हणाली, “काय सांगू तुम्हाला जिथे…”

तर आणखी एका नेटकऱ्याने “प्रिया तू अतिशय सुंदर आहेस. तुझ्या सौंदर्याबद्दल एक विशेष आपलेपण आणि आदर आहे. पण हे असले फोटो पोस्ट करण्याची तुला आवश्यकता नाही. तरीही, तुझ्या भूमिकांप्रमाणे तुझ्या वैचारिक स्वातंत्र्याचा सुद्धा आम्ही आदर करतो.”, अशी कमेंट केली आहे. पण काहींनी तिच्या या लूकला पसंती देत तिला पाठिंबा दिला आहे.