रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 3, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priya umesh new home

उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त

priya umesh new home : प्रत्येकालाच स्वतःच हक्काचं घर असावं असं वाटतं. यांत अनेक कलाकार मंडळीही आहेत ज्यांना स्वतःच हक्काचं घर व्हावं असं वाटतं. अनेक कलाकारांनी नवं घर घेतलंही आहे. काही कलाकारांनी तर यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या नव्या घरात साजरा केला. अभिनेता विवेक सांगळे, उमेश कामत, प्रिया बापट या कलाकारांनी गणरायाचे नव्या घरात थाटामाटात स्वागत केले. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामतने नवं घर घेतलं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.

त्यानंतर प्रिया व उमेश यांनी यंदाचा गणेशोत्सव हा त्यांच्या नव्या घरात अगदी पारंपरिक अंदाजात साजरा केला. याची झलक प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावर्षीचा गणेशोत्सव का खास ठरला हे सांगताना प्रिया बापट लिहिते, “नव्या घरातील आमचा पहिला गणेशोत्सव, आमचे अनेक मित्रमंडळी, नातेवाईक घरी आले होते. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी मी स्वतः जेवण बनवलं होतं. खूप गप्पा मारल्या, हसलो इतकी मजा केली की आता आवाज पण बसलाय”.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीचे प्रसिद्ध रेस्टॉरंट ‘बास्टियन बांद्रा’ला कायमचं टाळ, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

“सगळ्यांचा पाहुणचार करण्यात इतका वेळ गेला की आम्ही आमच्या गणु बाप्पाबरोबर फोटो देखील काढले नाहीत आणि आमच्या मित्रमंडळींबरोबर फोटो काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. पण, या सगळ्या आठवणी कायम आमच्याबरोबर राहतील. मी या आठवणी कायम जपून ठेवेन. आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. किती सुंदर गेले हे ७ दिवस. मी खरंच शब्दांतही सांगू शकत नाही. फक्त कृतज्ञता व्यक्त करते”, असं प्रियाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, १५ वर्षाचा संसार मोडला, बराच काळ long distance मध्ये राहिले अन्…

प्रियाच्या या पोस्टमध्ये तिचं नवं सुंदर असं घर पाहायला मिळत आहे. प्रशस्त हॉल, मॉड्युलर किचनची झलक यामध्ये पाहायला मिळाली आहे. समोर आलेल्या फोटोत प्रिया स्वतःच्या हाताने मोदक बनवताना दिसली, शिवाय बाप्पासाठी ती खास गोडाधोडाचंही बनवताना दिसली. प्रियाच्या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.

Tags: marathi actorpriya bapatumesh kamat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
shubhangi sadavarte divorce

राहुल देशपांडेनंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या पाच वर्षातच संसार मोडला, पतीने शेअर करत दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.