shubhangi sadavarte divorce : शास्त्रीय संगीतकार राहुल देशपांडे व नेहा देशपांडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राहुल व नेहा हे वेगळे झाले आहेत. घटस्फोटाची बातमी त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अर्थात या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे. यापाठोपाठ कलाविश्वात आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असल्याचं समोर आलं आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे. संगीत देवबाभळी या लोकप्रिय व गाजत असणाऱ्या नाटकातील अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झाला आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
शुभांगी सदावर्तेचा नवरा संगीतकार आनंद ओक याने सोशल मीडियावर घटस्फोटाबाबतची पोस्ट शेअर केली आहे. आनंदने पोस्ट शेअर करत शुभांगी आणि तो वेगळे झाला असल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “प्रिय मित्रांनो, शुभांगी आणि मी काही वर्षांपूर्वी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय स्वीकारण्यासाठी आणि तो दृढ करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला आणि आता तो मोकळेपणाने सांगण्यासाठी हाच योग्य क्षण वाटतो. आम्ही एकत्र घालवलेल्या वेळेबद्दल आणि आम्ही एकत्र चाललेल्या प्रवासाबद्दल मी आभारी आहे”.
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मी तिला भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती एक अद्भुत अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. जशा पुढे संधी येतील तसे आम्ही एकत्र सर्जनशीलपणे काम करत राहू. कृतज्ञतापूर्वक, आनंद”. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या शुभांगीने संगीतकार आनंद ओकसह लग्नगाठ बांधली.
आणखी वाचा – उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त
११ जुलै रोजी शुभांगी आणि आनंद यांनी करोना काळात लग्न केले. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर शुभांगी आणि आनंद या दोघांचा छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला सदावर्ते आणि ओक कुटुंबातील मोजके नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होती.





