Prithvik Pratap With Wife : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. अभिनेत्याने थेट लग्नसोहळ्याचे सुंदर असे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पृथ्वीकने त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. आपल्या अतरंगी अभिनयाने घरोघरी पोहोचलेल्या पृथ्वीक प्रतापने अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला.पृथ्वीकने लग्नाचे फोटो शेअर करुन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ताशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे अचानक समोर आलेले फोटो पाहून अनेकांना धक्का बसला.
अत्यंत साध्या पद्धतीत, अजिबात गाजावाजा न करताना पृथ्वीकने लग्न केलं. प्राजक्ता व पृथ्वीक आता लग्नानंतर देवदर्शनाला गेले आहेत. त्यांचा देवदर्शनाचा एक सुंदर असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात जात त्यांनी देवीचे दर्शन घेतले. लग्नानंतर पृथ्वीक कुटुंबाबरोबर त्याच्या गावी कराड येथे गेला आहे. कराड येथे गावी जातानाचा सुंदर असा व्हिडीओही पृथ्वीकने इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे.
समोर आलेल्या त्यांच्या देवदर्शनाच्या फोटोमध्ये पृथ्वीक व प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी पृथ्वीकने गुलाबी रंगाचा कुर्ता व पायजमा परिधान केला होता तर प्राजक्ताने हिरव्या रंगाची कॉटनची साडी नेसली होती. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. लग्नासाठी पृथ्वीक व प्राजक्ताने केलेल्या खास लूकचीही बरीच चर्चा रंगली होती. लग्नात प्राजक्ताने क्रिम कलरची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर तिने मोजकी ज्वेलरी आणि केसात गजरा माळला होता. तर पृथ्वीक पांढऱ्या रंगाच्या धोती सेटमध्ये दिसला. दोघांच्या गळ्यात मोगऱ्याचा हार पाहायला मिळाला.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, ‘त्या’ व्यक्तीला अटक
लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत पृथ्वीकने, “२५-१०-२०२४…एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” असं सुंदर कॅप्शन लिहिलं होतं. पृथ्वीकच्या लग्नाचे फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.