छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीने हास्यजत्रेत अनेक स्किट्स केले असून तिने केलेल्या प्रत्येक स्किट्समध्ये आपलं वेगळेपण जपत उत्तम अभिनय केलंय. याच दमदार अभिनयाच्या जोरावर तिने ‘फुलराणी’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती, ज्यात तिच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा झाली होती. प्रियदर्शनी अभिनयाबरोबरच उत्तम व्हॉइस आर्टिस्ट असून तिने अनेक इंग्लिश, हिंदी सिनेमे व वेबसिरीजसना आपला आवाज दिलेला. (priyadarshini indalkar)
आता हास्यजत्राची टीम अमेरिकेच्या दौऱ्यावर असून प्रियदर्शनीही त्यांच्यासोबत आहे. दरम्यान दौऱ्याच्या निमित्ताने अनेक कलाकार अमेरिकेतील विविध पर्यटनस्थळाचा मनमुराद आनंद लुटण्याबरोबर तिथले फोटोज शेअर करत आहे. प्रियदर्शनीही यात मागे नसून तीही तिथले फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते. आता तिने नुकतेच काही फोटोज शेअर केले असून तिच्या या फोटोजवर अनेक मजेशीर कमेंट्स येतायत. (priyadarshini instagram post)
पहा प्रियदर्शनीची इंस्टाग्राम पोस्ट (priyadarshini instagram post)
प्रियदर्शनीने नुकतंच अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरतानाचे काही फोटोज शेअर केले असून त्या फोटोंमध्ये प्रियदर्शनीच्या पाठीमागे एक व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसतोय. तिच्या या फोटोवर हास्यजत्रेतल्या सहकलाकाराने मजेशीर कमेंट केली असून चाहतेही अनेक भन्नाट कमेंट्स करताना दिसतायत.
प्रियदर्शनीने या फोटोजला कॅप्शन दिलंय, “New York City made me really happy”. तिच्या या पोस्टवर हास्यजत्रेतील सहकलाकार पृथ्वीक प्रतापने मजेशीर कमेंट करत लिहिलंय, “हे सौंदर्य पाहून एक माणूस मागे चक्कर येऊन पडला ❤️????”. त्यावर प्रियदर्शनीने “???????????? tulach disla toh!!” असं रिप्लाय दिला. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करून लिहिलंय, “अमेरिकेतील लोकांना अजून हे सौंदर्य सहन व्हायला वेळ लागेलं ! त्यामुळे त्यांना ग्लानी येणे स्वाभाविक आहे !????????????????????”. तिच्या या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्स येण्याबरोबर चाहत्यांसह सहकलाकारही भरभरून प्रेम देतायत. (prithvik pratap comment on priyadarshini instagram post)

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमांमुळे तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली असली, तरी बालपणापासून स्टॅन्डअप कॉमेडी शो व करणाऱ्या प्रियदर्शनीने आजवर अनेक एकांकिका, नाटक, सिनेमे, वेबसिरीज केल्या आहेत.