सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणात वेट लिफ्टिंग उचलणं पडलं महागात, प्रसिद्ध अभिनेत्रीवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “काय गरज?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
karishma tanna gym workout

गरोदरपणात वेट लिफ्टिंग उचलणं पडलं महागात, प्रसिद्ध अभिनेत्रीवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "काय गरज?"

karishma tanna gym workout : अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच तिच्या पहिल्या मुलाची आई होणार आहे आणि यादरम्यान तिने तिचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये हेवी डंबेल लावून छातीची कसरत करताना दिसत आहे. व्यायाम करतेवेळी तिचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. यावेळी तिने काही डेडलिफ्ट्सही केल्या, ज्याने चाहते आश्चर्यचकित झाले. चाहत्यांनी करिश्मा तन्नाचे कौतुक केले आणि तिला गर्भवती महिलांसाठी एक प्रेरणा म्हटले, तर वापरकर्त्यांनी तिला असे न करण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.

४२ वर्षीय करिश्मा तन्ना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आणि गर्भवती महिलांना उद्देशून लिहिले, “चला वर्कआउट करुया. मी जिमचे व्हिडीओ पोस्ट करणे चुकवत असते. तुम्ही पण?”. या व्हिडीओवर अभिनेत्रीचे चाहते आणि मित्रमंडळी खूप प्रेम करत आहेत. पण यूजर्सने त्यांना चेतावणी दिली. एका यूजरने लिहिले की, “कृपया असे करू नका. देवाने तुला या वयात आई होण्याचे आशीर्वाद दिले आहेत. तुम्ही यापुढे तरुण नाही, गर्भधारणेदरम्यान जोखीम घेऊ नका”. एकजण म्हणाला, “कसली मजबुरी? तुम्ही मुलाची काळजी घ्या”. एक कमेंट आली, “पहिल्या बाळावेळी एवढी रिस्क घेऊ नये, तीही वयाच्या ४२-४३ व्या वर्षी”.

View this post on Instagram

A post shared by Karishmma Tanna B (@karishmaktanna)

आणखी वाचा – रणदीप हुड्डाने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Karishmma Tanna B (@karishmaktanna)

करिश्मा तन्नाने ६ एप्रिल रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये पती वरुण बंगेरासोबत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती आणि प्रसूती ऑगस्ट २०२६ मध्ये होणार असल्याचे सांगितले होते. ती गरोदरपणाच्या या सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे. करिश्माने फेब्रुवारी २०२२ मध्ये वरुणसोबत लग्न केले. वरुण बंगेरा हा व्यवसायाने व्यापारी आहे. २०१८ मध्ये त्यांची पहिली भेट झाली आणि वरुणने करिश्माला दुबईमध्ये प्रपोज केले. यानंतर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे लग्न झाले आणि आता ते पालक होणार आहेत.

Tags: bollywood actressgym workoutKarishma Tanna
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Swapnil Rajshekhar Post

"दर दोन वाक्याला भेंxx, फट गई…", स्टॅंडपवाले चेकाळलेत म्हणत मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, "शिवीगाळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.