Swapnil Rajshekhar Post : सुप्रसिद्ध कॉमेडियन समय रैना त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या शोच्या वादानंतर तब्बल १४ महिन्यांनी परतला आहे. त्याच्या समय रैना still alive या व्हिडीओने अल्पावधीतच मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठला आणि अनेकांच्या मनात घर केलं. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी त्याच्या कमबॅकच कौतुक केलं. तर काहींनी समय रैनाला ट्रोल करण्याची एकही संधी गमावली नाही. या सगळ्या चर्चांदरम्यान आता एका अभिनेत्याची पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. समय रैनासह आजचे अनेक कॉमेडियन आणि तरुण पिढी देत असलेल्या बिनधास्त शिव्या, अपशब्दांवर या मराठमोळ्या अभिनेत्याने खरमरीत पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. दर दोन वाक्याला शिवीगाळ करता?, तुम्ही घरातसुद्धा असंच बोलता का?, असा सवाल करत स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट केली आहे.
भाषेवर प्रेम असलेल्या स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “असं पाहा की, काही नाही, सगळेच यावर बोलतायत. आपण नाही बोललो तर उगाच FOMO का काय तो येतो मग आपल्याला. माझं बाकी काहीच म्हणणं नाही पण समय रैना आणि या समस्तच स्टॅंडपवाल्यानी तरुणांची vocabulary बदलून ठेवलीय. किंवा काही अपशब्द स्टेजवरुन सतत वापरुन ती cool सहज करुन ठेवलीये. आणि unreal आहे हे. दर दोन वाक्याला भेंxx, लंx, गांx, लौx, बहन के लौx, मा के लौx . कोण बोलत असं नॉर्मली ?. बरं, घरात सुध्दा हे असंच बोलतात?. “अरे पापा… भेंxx क्या बताऊ आपको. आज मा चूx गई भेंxx ट्राफिक मे. मेरे तो लौx लग गए… आगे एक बहन लौx खडा था… हिल ही नही रहा था भेंxx . मेरी तो गांx फट गई…”. असं नसतील बोलत ना. अगदी मित्रात सुध्दा सतssत असं बोलत असतील हे खरं वाटत नाही… मग स्टेजवर उभं राहून प्रत्येक दोन वाक्याला हे का? काय कूल आहे यांत? “.
आणखी वाचा – मासिक पाळीबाबत बोलणं अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकरी म्हणाले, “स्वतः डॉक्टर आहे, लाज वाटते का?”
समय रैनाला उद्देशून ते पुढे म्हणाले, “सध्या समय रैनाच्या still alive ची भलावण करणारेही “त्यातली अश्लीलता वगळून, शिवीगाळ वगळून पहाल तर” म्हणतायत. तर का वगळा?. बरं, हिंदी वाल्यांची जोरदार सद्दी बघुन मराठी स्टॅंडपवाले पण चेकाळलेत. आताशा मराठीत तर “मला भिती वाटली” “मला काळजी वाटली” “माझ्यावर दडपण आलं” “मी घाबरलो/घाबरले” या सगळ्या एक्सप्रेशन्ससाठी “माझी फाटली” “फाटून हातात आली” हे रुळलंय. भितीच्या सगळ्या भावना एकाच अवयवाशी आणुन ठेवल्यात आपण. शाळेच्या पोरासोरं निबंधात “फाटली” लिहीतायत याचे रील्स पाहिले आपण. माझ्याच सेटवरच्या चिमुकलीने माझ्यावर गमतीने कविता करताना “माझे आबा पाटील पाटील, ते रागवले तर सगळ्यांची फाटील” अशी केली काय बोलावं?”.
आणखी वाचा – रणदीप हुड्डाने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
शेवटी त्यांनी म्हटलं, “बरं… माझ्या काही भावना वगैरे दुखावत नाहीत याने पण वाईट वाटतं. हळहळ वाटते, एवढी समृध्द संपन्न भाषा आपली ती अशी संकुचित का होतेय, पोरांना तिची समृध्दी कळु दे तर… एवढं आणि इतकंच तेही एक भाषाप्रेमी म्हणून वाटतं. बाकी चालू दे”. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. आणि त्यांचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हणत दुजोरा दिला आहे.





