‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून दगडू म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने आजवर अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच नुकताच त्याचा ‘होय महाराजा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी त्याचे अनेक चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अशातच एका खास व्यक्तीने प्रथमेशचे तोंडभरून कौतुक केले आहे आणि ही खास व्यक्ती म्हणजे प्रथमेशची बायको क्षितिजा.
क्षितिजा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे व प्रथमेशबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याच्या कामाबद्दलची माहितीही ती सोशल मीडियाद्वारे देत असते. क्षितिजाने प्रथमेशबद्दल अनेकदा खास पोस्ट शेअर करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. अशातच तिने प्रथमेशच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
क्षितिजाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “आमचं रिलेशनशिप सुरू झाल्यापासून प्रथमेशच्या चित्रपटाचा एकही प्रीमियर मी चुकवला नाही. पण तब्येत खूपचं बरी नसल्यामुळे, ‘होय महाराजा’च्या प्रीमियरला काही जाता आलं नाही. प्रथमेशने “काळजी करू नको, तू विश्रांती कर, आपण नंतर बघू चित्रपट” असं म्हणून शेवटी आम्ही काल चित्रपट बघितला”.
गर्दीमध्ये त्याच्याबरोबर चित्रपट बघणे हा एक टास्कच होता. तो बाजूला बसलेला असूनदेखील, स्क्रीनवरील त्याच्यावरून नजर हटत नव्हती. तो एक उत्कृष्ट अभिनेता होता, आहे आणि यापुढेही राहील. आणि मी त्याची पहिलीच चाहती असेन. हसून हसून अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं होतं. “अगं, हो, क्षितिजा, हो, बास बास, अशी स्वतःचीच काही वाक्य माझ्या कानांवर येत होती. ज्याकडे मी दुर्लक्ष करुन अगदी मनसोक्त हसत होते”.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन
यापुढे क्षितिजाने सगळ्यांचीच काम अफलातून झाली आहेत. गाणी सुद्धा कमाल झाली आहेत. खुप मजा आली. तुम्ही सुद्धा चित्रपट बघा” असं म्हटलं आहे. दरम्यान. क्षितिजाच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.