मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

माहेरचं घर सोडताना होणाऱ्या बायकोचं भरुन आलं मन, प्रथमेश परबला पाहवेना, म्हणाला, “तुला एवढं प्रेम देऊ की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 23, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar

माहेरचं घर सोडताना होणाऱ्या बायकोचं भरुन आलं मन, प्रथमेश परबला पाहवेना, म्हणाला, “तुला एवढं प्रेम देऊ की...”

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच प्रथमेशच्या हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. प्रथमेश व क्षितिजा गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या अफेअरला ३ वर्ष पूर्ण होताच त्यांनी साखरपुडा सोहळा उरकला. प्रथमेश व क्षितिजाच्या साखरपुड्याच्या फोटोंनीही सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तसेच अभिनेत्याच्या होणाऱ्या बायकोच्या हळदी व मेहंदीचे अनेक फोटो समोर आले. (Prathamesh Parab Kshitija Ghosalkar)

प्रथमेशची होणारी बायको ही मूळची कोकणातली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश त्याच्या सासरच्या घरीही पोहोचला होता. यावेळी त्याच्या सासरच्या लोकांनी जावयाचे भरभरुन लाड केलेलेही पाहायला मिळाले. प्रथमेश व क्षितिजाची लगीनघाई सुरु असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. अशातच प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्षितिजाने तिच्या घराचा एक फोटो पोस्ट करत दिलेलं भावुक कॅप्शन साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’मधून निलेश साबळेची एक्झिट, स्वतःच केला खुलासा, प्रकृती ठिक नसल्यामुळे मोठा निर्णय, म्हणाला, “गेले काही दिवस…”

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

क्षितिजाने माहेरच्या आठवणी जपणारी एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत तुझी माझं घर अशी असलेली ओळख आता माझं माहेर अशी होणार. आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार. तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळाला आहे. बघ ना, काही मनसोक्त हसत आहेत. काही अलवार रडत आहेत. काहींमध्ये मला माझं बालपण दिसतं आहे. तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल दिसत आहे”.

आणखी वाचा – …आणि पुन्हा एकदा टॉम क्रूजची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली, तीन घटस्फोटांनंतर २५ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप अन्…

पुढे तिने असंही म्हटलं आहे की, “त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार आहे. सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला. तुही मग तयार रहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला. तळटीप – सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल”, असं म्हटलं आहे. या पोस्टवर प्रथमेशने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “किती छान. तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घर आपली वाटतील. आय लव्ह यु” अशी कमेंट प्रथमेशने केली आहे. या कमेंटवर क्षितिजाने कमेंट करत, “हो नक्की. आय लव्ह यु टू”, असं प्रतिउत्तर दिलं आहे.

Tags: entertainmentkshitija ghosalkarkshitija ghosalkar homeprathamesh parabPrathamesh Parab Kshitija Ghosalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Oppenheimer film will be released on the Jio Cinema OTT platform

अनेक पुरस्कार व प्रेक्षकांच्या प्रेमाने सन्मानित झालेला ‘ओपेनहायमर’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, मोफत पाहता येणार, वाचा कधी व कुठे?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.