गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेहंदी रंगली गं! क्षितिजा घोसाळकरच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी, खास डिझाइन अन् कानातल्या दागिन्यांची होतेय चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding

मेहंदी रंगली गं! क्षितिजा घोसाळकरच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी, खास डिझाइन अन् कानातल्या दागिन्यांची होतेय चर्चा

अभिनेता प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरने एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यानंतर अखेर ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश व क्षितिजाचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत दोघांनी त्यांचा साखरपुडा समारंभ उरकला. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding)

अत्यंत पारंपरिक अंदाजात संपन्न झालेल्या या साखरपुड्याच्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान प्रथमेश व क्षितिजाच्या साखरपुडा समारंभातील साधेपणाने प्रेक्षकांची मनंही जिंकली. यानंतर आता दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून क्षितिजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मेहंदी सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. क्षितिजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी रंगली असल्याचं पाहायला मिळत आहे. “तुझ्या नावाची मेहंदी काढली रे”, असं कॅप्शन देत मेहंदी लावतानाचे व मेहंदी लावल्यानंतरचे काही खास फोटो क्षितिजाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. हे फोटो तिने प्रथमेशला टॅगही केलेले पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – प्रथमेश परबला लागली क्षितिजा घोसाळकरच्या नावाची हळद, बेभान होऊन नाचले, धमाल-मस्ती अन्…; फोटो तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचा मेहंदी समारंभातील खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक टच असलेला हिरव्या रंगाचा वनपीस परिधान करत क्षितिजा या लूकमध्ये खूप खास दिसत होती. शिवाय यावेळी तिने परिधान केलेल्या दागिन्यांनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. क्षितिजने घातलेल्या कानातल्या दागिन्यांमध्ये प्रथमेशची पराजू असं लिहिलं होतं. ‘टाईमपास’ चित्रपटातील प्रथमेशची दगडू व केतकीची पराजू ही भूमिका विशेष गाजली. त्यामुळे प्रथमेशला दगडू या नावाने लोकप्रियता मिळाली.

आणखी वाचा – लेकाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारच नाही अनुष्का शर्मा?, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणालेली, “मुलं जन्मल्यानंतर…”

क्षितिजाच्या या मेहंदी सोहळ्यातील लूकचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर लाईक्स व कमेंटदेखील होताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नव्हेतर एकीकडे प्रथमेशला क्षितिजाच्या नावाची हळद लागली आहे. प्रथमेशच्या हळदी समारंभाचे फोटोदेखील समोर आले आहेत. अगदी थाटामाटात नाचत गाजत प्रथमेशच्या हळदी समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. कलाकार मंडळी तसेच जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या समवेत प्रथमेशचा हा हळदी समारंभ पार पडलेला पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentKshitija Ghosalkar mehendi ceremonyPrathamesh Parab And Kshitija Ghosalkar Weddingprathamesh parab wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

समुद्रकिनारी रोमान्स, पारंपरिक लूक अन्…; लग्नाला दोन महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.