शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समुद्रकिनारी रोमान्स, पारंपरिक लूक अन्…; लग्नाला दोन महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

समुद्रकिनारी रोमान्स, पारंपरिक लूक अन्…; लग्नाला दोन महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा

मराठी सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकार मंडळींचे लग्न सोहळे पार पडलेले पाहायला मिळाले. एका मागोमाग एक लग्नबंधनात अडकत गेलेल्या या जोड्यांच्या लग्नसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यामध्ये एका जोडीचं विशेष कौतुक झालेलं पाहायला मिळालं. आणि या जोडीवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. ही जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘आमचं ठरलं’ म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर दोघांनीही त्यांचा शाही थाटामाटात लग्नसोहळा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)

मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नसोहळ्यामुळे अधिक चर्चेत आलेले पाहायला मिळाले. चिपळूण येथे डेस्टिनेशन वेडिंग करत त्यांनी त्यांचा लग्नसोहळा पार पाडला. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धा व प्रथमेश यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. मुग्धा व प्रथमेश यांच्या गाण्यांचे लाखो चाहते दिवाने आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही या दोघांच्या आवाजाचे चाहते आहेत. लग्नानंतर ही जोडी संसारात रमलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! क्षितिजा घोसाळकरच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी, खास डिझाइन अन् कानातल्या दागिन्यांची होतेय चर्चा

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश बरेचदा कामानिमित्त एकत्र दौरे करतानाही पाहायला मिळाले. गायनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम घेत, तसेच गायन सेवा करत प्रथमेश व मुग्धाने त्यांची काम सुरुच ठेवली. आज प्रथमेश व मुग्धा यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. लग्नाला दोन महिने पूर्ण होताच प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका रोमँटिक व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्रकिनारी शूट केलेला हा व्हिडीओ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला आहे.

आणखी वाचा – प्रथमेश परबला लागली क्षितिजा घोसाळकरच्या नावाची हळद, बेभान होऊन नाचले, धमाल-मस्ती अन्…; फोटो तुफान व्हायरल

या व्हिडीओमधील मुग्धा व प्रथमेशच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने यावेळी सोनेरी काठ असलेली भगव्या रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. तसेच त्यावर घातलेल्या दागिन्यांनी मुग्धा खूपच सुंदर दिसत होती. तर प्रथमेश पारंपरिक शेरवानीमध्ये पाहायला मिळाला. समुद्रकिनारी रोमॅंटिक अंदाजात केलेलं हे फोटोशूट खूप खास असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.

Tags: entertainmentmugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate romantic lookMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Vandana Gupte Wedding Anniversary

५१ वर्षांचा संसार, एकमेकांवर जीवापाड प्रेम अन्…; वंदना गुप्तेंनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासह शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाल्या, "इतकी वर्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.