अभिनेता प्रथमेश परब याचा नुकताच साखरपुडा समारंभ उरकला. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा केला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत प्रथमेशने त्याच्या आयुष्यातील खऱ्या प्राजुसह साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अगदी साधेपणाने प्रथमेश व क्षितिजा यांचा साखरपुडा समारंभ संपन्न झाला. त्यांच्या या खास फोटोंनी सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Ring)
अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठरल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन देत प्रथमेशने साखरपपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या साखरपुड्यातील साधेपणाचं सोशल मीडियावर विशेष कौतुक केलं जात आहे.
साखरपुड्यासाठी अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. कोणताच अवाढव्य खर्च व महागडे कपडे परिधान न करता दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा हा समारंभ उरकला. याशिवाय गुलाबी रंगाच्या मॉडर्न अंदाजात परिधान केलेल्या प्रथमेश व क्षितिजाच्या कपड्यांनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्यातील अंगठीच्या खास डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्यातील अंगठीमध्ये दोघांच्या नावांमधील पहिली अक्षर पाहायला मिळत आहेत. प्रथमेशने क्षितिजाच्या नावाच्या k या नावाची अंगठी घातली आहे तर त्याच्या बायकोने प्रथमेशच्या पहिल्या अक्षराची p या नावाची अंगठी परिधान केली आहे. दोघांच्या अक्षराने सुरुवात झालेल्या अंगठीच्या या हटके कन्सेप्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोणताच अवाढव्य खर्च न करता प्रथमेश व क्षितिजा यांचा साधेपणाने झालेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर साऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.