शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वेड प्रेमाचे! प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, स्टेजवरच शाहरुख स्टाईल पोज दिली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor Prathamesh Parab got engaged with girlfriend Kshitija Ghosalkar photos viral om social media

वेड प्रेमाचे! प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, स्टेजवरच शाहरुख स्टाईल पोज दिली अन्...

१४ फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस. खरंतर फेब्रुवारी हा पूर्ण महिनाच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. ‘व्हॅलेंटाईन डे’ चे औचित्य साधत अनेक जोडीदार आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. पण नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्याने कालच्या ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत आपला साखरपुडा उरकला आणि हा मराठमोळा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. ‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाची चर्चा गेले काही दिवस सुरू होती.

जानेवारी महिन्यात केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने साखरपुडा व कालांतराने लग्नाची तारीख जाहीर केली होती आणि ठरल्याप्रमाणे काल (१४ फेब्रुवारी) रोजी प्रथमेश-क्षितिजा यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. त्यांच्या या साखरपुडा सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

“आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला. आता इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन देत प्रथमेशने-क्षितिजा यांनी त्यांच्या या साखरपुडा सोहळ्याचे खास क्षण  सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या खास सोहळ्यासाठी प्रथेमशने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर नक्षीकाम अशी पैठणी साडी नेसली होती.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आणखी वाचा – ८५ किलो वजन, सतत ट्रोलिंग अन्…; बॉडी शेमिंगवरुन ट्रोल झालेली ‘ही’ अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका,सगळ्यांशी झगडून पूर्ण केलं आईचं स्वप्न

प्रथेमशने त्याच्या गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाईलमध्ये क्षितिजाच्या बोटात अंगठी घातली अन् त्यांचा हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला.  प्रथमेश-क्षितिजा यांच्या या साखरपुडा सोहळ्याला जवळचा मित्रपरिवार, नातेवाईक व मराठी कालाविश्वातील काही कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती.

आणखी वाचा – “उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून…”, टॅक्सी चालवण्याबाबत रवींद्र महाजनींच्या बायकोचा खुलासा, म्हणाल्या, “वेश्यांकडे गिऱ्हाईकांना…”

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा यांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच प्रथमेश-क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. त्याप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच १० दिवसांनी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजनमराठी कलाकारमराठी बातमीक्षितिजा घोसाळकरप्रथमेश परबप्रथमेश परब क्षितिजा घोसाळकर साखरपुडाप्रथमेश परब क्षितिजा घोसाळकर साखरपुडा सोहळाentertainment newskshitija ghosalkarmarathi actormarathi actorsMarathi artistmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsprathamesh parabPrathamesh Parab Kshitija Ghosalkar SakhpudaPrathamesh Parab Kshitija Ghosalkar Sakhpuda Ceremony
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्..; लग्नानंतर प्रथमेश व मुग्धाने साजरा केला पहिला व्हॅलेंटाईन डे, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.