गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. नेहमीच दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच काही महिन्यांपूर्वी मुग्धा व प्रथमेशने लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही विवाह सोहळ्यामुळे ही जोडी चर्चेत आली. विवाह सोहळ्यानंतर ही जोडी विशेष लक्षवेधी ठरली. मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडले. दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करत त्यांचा विवाहसोहळा उरकला. (prathamesh laghate on mugdha vaishampayan)
मुग्धा व प्रथमेश हे लग्नानंतर त्यांच्या संसारात रमलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर मुग्धा लाघाटेंच्या घरी बऱ्यापैकी रमलेली पाहायला मिळाली. प्रथमेश हा मूळचा कोकणातला असल्याने मुग्धा व प्रथमेश बरेचदा कोकणातील अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या रामनवमीनिमित्त मुग्धाचं ‘राघवा रघुनंदना’ हे नवकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. रामनवमीनिमित्त प्रथमेशने त्याच्या बायकोसाठी शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मुग्धाने रामनवमीनिमित्त नैवेद्य म्हणून खास जेवण बनवलेलं पाहायला मिळत आहे.

या खास पंचपक्वान्नाचा फोटो पोस्ट करत प्रथमेशने “श्रीरामनवमी महानैवेद्य माझ्या पप्रिय बायकोने बनवला आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. वरण-भात तूप तुळशीपत्र, बटाट्याची भाजी, कुरडइ, पोळी, गाजर टोमॅटो कोशिंबीर, लघाटे आंबेवाल्यांकडचा आमरस आणि आंब्याच्या फोडी, असं पंचपक्वान्नाचा जेवण मुग्धाने रामनवमी विशेष बनवलं होतं. प्रथमेशन बायकोने बनवलेल्या या साग्रसंगीत जेवणाचा फोटो पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे.
मुग्धा कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत तिच्या घरातल्यांना, कुटुंबीयांना वेळ देताना दिसते. मुग्धा व प्रथमेशांच्या गायनाचे बरेच चाहते आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धा व प्रथमेश गायनसेवा करण्यासाठी अनेकदा दौरे करताना दिसतात. प्रथमेशने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लघाटे आंबेवाले या आंब्याचा व्यवसायाबाबतची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली होती. अनेकांनी मराठी माणूस व्यवसायात उतरला असल्याचं म्हणत प्रथमेशचं कौतुकही केलेलं पाहायला मिळालं. तर काहींनी प्रथमेशला या आंब्याच्या व्यवसायावरुन ट्रोलही केलं. मात्र प्रथमेशने या ट्रोलिंगला न जुमानता हा व्यवसाय सुरू ठेवला आहे.